नागपूर जिल्ह्यातील उमरेड परिसरात रात्री गावाबाहेर शामियानात चालतो ‘न्यूड डान्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 07:00 AM2022-01-22T07:00:00+5:302022-01-22T07:00:12+5:30

Nagpur News दुपारपासून ते सायंकाळपर्यंत ‘सर्जा-राजा’ची शर्यत आणि रात्र होताच बंद शामियानात ‘न्यूड डान्स’. बीभत्सपणाचा कळस गाठणारा प्रकार नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात अलीकडील काही दिवसात बघावयास मिळत आहे.

'Nude Dance' is performed in a shamiana outside the village at night in Umred area of Nagpur district. | नागपूर जिल्ह्यातील उमरेड परिसरात रात्री गावाबाहेर शामियानात चालतो ‘न्यूड डान्स’

नागपूर जिल्ह्यातील उमरेड परिसरात रात्री गावाबाहेर शामियानात चालतो ‘न्यूड डान्स’

Next
ठळक मुद्देशंकरपटाच्या नावावर रात्रीस खेळ चाले

अभय लांजेवार

नागपूर : दुपारपासून ते सायंकाळपर्यंत ‘सर्जा-राजा’ची शर्यत आणि रात्र होताच बंद शामियानात ‘न्यूड डान्स’. बीभत्सपणाचा कळस गाठणारा प्रकार नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात अलीकडील काही दिवसात बघावयास मिळत आहे. रात्रीच्या अंधारात हा किळसवाणा खेळ शेकडो तरुणाईच्या उपस्थितीत शंकरपटाच्या नावाखाली सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

उमरेड आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये ‘डान्स हंगामा’ अशी जाहिरातबाजीची पत्रके भिंतीवर लावण्यात आली आहेत. यावर सिम्पल हंगामा, हॉट हंगामा, नो एन्ट्री हंगामा असे आवाहन करीत ‘एलेक्स जुली के हंगामे’ असे नमूद करण्यात आले आहे. कुही तालुक्यातील मुसळगाव, भूगाव आणि सिल्ली तर उमरेड तालुक्यातील बाम्हणी या ठिकाणी या ‘डान्स शो’चे आयोजन नुकतेच पार पडले. पहिल्या तीन गावांमध्ये या डान्स शोने काही प्रमाणात मर्यादा ओलांडल्या. चाैथ्या कार्यक्रमात बाम्हणी शिवारात पार पडलेल्या ‘डान्स शो’मध्ये मात्र ‘न्यूड डान्स’ने चांगलाच हंगामा केला. या ठिकाणी सायंकाळी ७ वाजता नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू गर्दी वाढायला लागली. पाचशेवर तरुण बंद शामियानात गोळा झाले. त्यानंतर हिंदी गाण्यांच्या तालावर तरुण-तरुणी थिरकल्या. क्षणभरातच मंचावर अक्षरश: विवस्त्र होत ‘न्यूड डान्स’सुद्धा बघावयास मिळाला.

शेकडो तरुणांच्या गर्दीत बंद शामियानात हा प्रकार मागील काही दिवसापासून गावखेड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जात आहे. केवळ १०० रुपयामध्ये हा डान्स हंगामा बघण्यासाठी तरुणांची गर्दी उसळत आहे. बाम्हणी येथील सादरीकरणादरम्यान अनेकांनी ‘न्यूड डान्स’चे व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. यामध्ये दोन तरुणी आणि दोन तरुण अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत दिसून येतात.

आणि डान्स हंगामा रद्द

अंगावर केवळ अंतर्वस्त्र परिधान केलेल्या दोन तरुणींचा मंचावरील डान्स आणि त्यांच्या सोबतीला अर्धनग्न कपडे घातलेले दोन तरुण असा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील तरुणींना वारंवार विवस्त्र करीत असल्याचाही प्रकार कैद झाला. या न्यूड डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताच, आता काही गावांमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समजते.

Web Title: 'Nude Dance' is performed in a shamiana outside the village at night in Umred area of Nagpur district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app