आजकाल 'भारत माता की जय' बोलायला शिकवावं लागतं - मोहन भागवत
By Admin | Updated: March 3, 2016 13:14 IST2016-03-03T13:14:41+5:302016-03-03T13:14:41+5:30
आजकाल आपल्या देशातल्याच लोकांना 'भारत माता की जय' असं बोलायला शिकवाव लागत असल्यांची खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे

आजकाल 'भारत माता की जय' बोलायला शिकवावं लागतं - मोहन भागवत
>ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. ३ - आजकाल आपल्या देशातल्याच लोकांना 'भारत माता की जय' असं बोलायला शिकवाव लागत असल्यांची खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे. जेएनयू प्रकरणावर बोलताना मोहन भागवत यांनी हे मत व्यक्त केलं. 'भारत माता की जय' असं बोलायला शिकवाव लागतय कारण असं बोलू नका सांगणा-या लोकांची संख्या जास्त आहे. भारताने अमेरिकेप्रमाणे महासत्ता होण्याची गरज नाही मात्र मातृशक्तीचा सर्वात जास्त आदर असेल अशी महासत्ता होण्याची गरज आहे. सध्या मातृशक्ती कमकुवत होत चालली आहे, आपल्याला अशा परिस्थितीचा सामना करण्याची गरज असल्यांच मोहन भागवत बोलले आहेत.