शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आता लग्नासाठी थेट २६ जूनचा मुहूर्त; व्यावसायिकांना आर्थिक झळ

By मोरेश्वर मानापुरे | Published: May 06, 2024 8:58 PM

- तब्बल २३ वर्षानंतर ही परिस्थिती : विवाहाचे योग गेल्या वर्षीपेक्षा कमी

नागपूर: यावर्षी मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीला विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांनी एप्रिलमध्येच लग्नाचा बार उडवून टाकला. ३ मे ते २५ जूनपर्यंत एकही विवाह मुहूर्त नसल्यामुळे नुकतेच लग्न जुळलेल्या वधू-वरांना मुहूर्तासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लग्नकार्य नसल्यामुळे सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

मे आणि जून महिन्यात लग्नकार्य नसल्यामुळे बँडवाल्यांपासून ते मंडप डेकारेशन, मंगल कार्यालय, लॉन, आचारी, कॅटरर्स, पुरोहित, छायाचित्रकारांपर्यंत आदी लग्न कार्यांवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक झळ बसणार आहे. मे आणि जून महिन्यात लग्न तारखा नसल्यामुळे या दिवसात काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यावर्षी विवाहाचे योग गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत.

दरवर्षी मे आणि जून महिन्यात विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात पार पडतात. यंदा मात्र मे-जूनमध्ये गुरू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा एकत्रित अस्त असल्याने या काळात मंगलकार्य करू नये, असे शास्त्र सांगते. दोघांचा एकत्रित अस्त असल्याने मेमध्ये केवळ १ आणि २ रोजी आणि २५ जूननंतर मुहूर्त आहेत. अशी परिस्थिती २३ वर्षांनंतर पहिल्यांदा आली आहे.  

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत ६५ मुहूर्तयंदा विवाहासाठी एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत ६५ मुहूर्त आहेत. काही कुटुंब मुहूर्त न बघताच लग्नकार्य आटोपण्याच्या मनस्थितीत आहेत. मेमध्ये फारसे मुहूर्त नसल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी मुलांचे लग्न एप्रिलमध्येच आटोपून घेतले. नुकतेच लग्न जुळलेल्या युवक-युवतींना मुहूतार्साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जोखिम घेऊ नयेलग्नाच्या वेळेत गुरू महत्त्वाचा असतो. गुरूच्या बाबतीत जोखिम घेता येत नाही. गुरू आणि शुक्र या दोघांपैकी एकाचा अस्त असताना मुहूर्त असतात. पण, दोघांचा एकत्रित अस्त असल्याने मे महिन्यात अवघे दोन दिवस मुहूर्ताचे होते. २५ जूननंतर लग्नाचे मुहूर्त आहेत. लग्न एक वा दोन महिने उशिरा झाले तर काहीही फरक पडणार नाही. डॉ. अनिल वैद्य, ज्योतिषाचार्य.

 

टॅग्स :nagpurनागपूरmarriageलग्न