शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

आता चक्क होतेय ‘ड्रोन्स’ व विदेशी मद्याची ‘स्मगलिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:36 AM

पाच वर्षांत नागपूर शहरात चक्क ‘ड्रोन्स’ अन् विदेशी मद्याच्या ‘स्मगलिंग’चा प्रयत्न झाला. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे‘कस्टम’च्या कारवाईत अडकले प्रवासीसात वर्षांत पावणेपाच कोटींहून किमतीचे सोने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवाईमार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे बारीक लक्ष असते. सर्वसाधारणत: हवाईमार्गाने सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त प्रमाणात बेकायदेशीरपणे आणल्या जातात असा समज आहे. परंतु मागील पाच वर्षांत शहरात या वस्तूंसह चक्क ‘ड्रोन्स’ अन् विदेशी मद्याच्या ‘स्मगलिंग’चादेखील प्रयत्न झाला. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर कार्यालयाकडे विचारणा केली होती. २०१५ पासून कार्यालयाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’ने अनधिकृतपणे आणण्याचा प्रयत्न येणाºया किती वस्तू पकडल्या, कितीचा मुद्देमाल जप्त झाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते जानेवारी २०२० या कालावधीत हवाईमार्गाने चक्क ६७ लाख ६० हजार ०८४ रुपयांच्या बेकायदेशीररीत्या वस्तू आणणात आल्या. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात लॅपटॉप सह ‘ड्रोन्स’, विदेशी मद्य, चांदी, विदेशी चलन, सिगारेट, हर्बल पावडर यांचा प्रामुख्याने समावेश होता. दरम्यान, हवाईमार्गाने अनधिकृतपणे सोने आणण्याचादेखील प्रयत्न झाला. २०१३ ते जानेवारी २०२० या कालावधीत ४ कोटी ९६ लाख ७२ हजार ९६० इतक्या किमतीचे सोने जप्त करण्यात आले.महिनाभरात ५३ लाखांचे सोने पकडले२०२० मध्ये जानेवारी महिन्यातच ‘एअर कस्टम्स युनिट’ने विमानतळावर अनधिकृतपणे येणारे १,५६८.८७ ग्रॅम सोन्याचा माल पकडला. माहिती अधिकारातील माहितीनुसार या मालाची किंमत ५३ लाख २१ हजार २५ रुपये इतकी होती.२०१५ मध्ये पकडले ३ किलो सोने३० जून २०१५ या एकाच दिवशी सर्वाधिक ३००२ ग्रॅम सोन्याचा माल पकडण्यात आला होता. त्याची किंमत ७४ लाख ६१ हजार २१२ इतकी होती. ५ नोव्हेंबर २०१४ रोजी २,७२३ ग्रॅम तर २३ मार्च २०१४ रोजी १,४८१.६९ सोन्याचा माल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी