शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:00 IST

Vajramuth Sabha in Nagpur: या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे.

मविआची आज नागपुरमध्ये वज्रमुठ सभा होत आहे. संभाजीनगरमध्ये पहिली सभा झाली होती. या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे. ईडीला काहीही पुरावे मिळलेले नाहीत. ज्या माणसाने माझ्याविरोधात तक्रार केलेली तो सहा महिने परदेशात फरार झालेला, असे देशमुख म्हणाले. 

या सभेला मविआचे सर्व वरिष्ठ नेते हजर आहेत. ईडीला काहीही पुरावे मिळलेले नाहीत. ज्या माणसाने माझ्याविरोधात तक्रार केलेली त्याला कोर्टाने हजर राहण्यास सांगितले होते. तो  न्यायालयात आलाच नाही. परदेशात सहा महिने फरार होता. परमबीर सिंगांना दबाव टाकून माझ्याविरोधात उभे करण्यात आले. वर्षभर मला आत टाकलेले. कोर्टात जेव्हा हे प्रकरण गेले तेव्हा कोर्टाने त्यांची कागदपत्रे पाहिली. त्यात काहीच सापडले नाही. कोर्टाने हे सर्व आरोप ऐकीव आहेत, असे सांगितले. मग ईडीने एक कोटी ७१ लाखांचा ठपका ठेवला, त्यावरही कोर्टाने पुरावे मागितले परंतू ते देखील दिले नाहीत, असा आरोप देशमुख यांनी केला. 

आता मला कोणताही माइकालाल मैदानात येण्यापासून थोपवू शकणार नाही, असे आव्हान माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिले. आजच्या मविआच्या सभेला विरोध करण्याचा काहींनी प्रयत्न केला. संभाजीनगरची विराट सभा पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. यामुळे ते विरोध करत होते, असा आरोपही देशमुख यांनी केला. शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली. पंचनामे झाले परंतू ज्या पद्धतीने मदत व्हायला हवी तशी सरकारकडून झालेली नाही. संत्रा मोसंबीचे सात आठ महिन्यांपूर्वी नुकसान झाले होते. रिपोर्ट जाऊनही आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. विधानसभेत दीड महिन्यांपूर्वी फडणवीसांनी लवकरच देऊ असे सांगितले होते. परंतू आजवर मदत मिळालेली नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. 

कापसाचे भाव कर रद्द केल्याने पडले. निर्यात परदेशात केली गेली नाही, यामुळे देखील दर पडले. शेतकरी अडचणीत असताना बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेले, परंतू परतफेड करू शकलेले नाही. त्यांच्या शेताचे लिलाव काढण्यात आले आहेत, यावर देखील सरकारने निर्णय घेतलेला नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाnagpurनागपूर