आता हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्ससाठीही नागपूर सज्ज, एअरबसने मिहानच्या इंडामेर एमआरओला बनविले ऑथोराईज सेंटर
By नरेश डोंगरे | Updated: December 6, 2023 00:37 IST2023-12-06T00:35:57+5:302023-12-06T00:37:09+5:30
गेल्या २० वर्षांपासून देशात एअरबस हेलिकॉप्टर उडत आहेत.

आता हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्ससाठीही नागपूर सज्ज, एअरबसने मिहानच्या इंडामेर एमआरओला बनविले ऑथोराईज सेंटर
नागपूर : जंबो जेट सह अन्य विमानांच्या रखरखावासाठी पुढे सरसावलेल्या नागपूरच्या मिहानमधील एमआरओत आता हेलिकॉप्टरचीही देखभाल केली जाणार आहे. एअरबसने भारतात आपल्या एअरबस हेलिकॉप्टर एच - १४५ च्या मेंटेनन्ससाठी मिहानमधील एमआरओला ऑथोराईज सर्व्हीस सेंटर बनविण्याचा करार केला आहे.
गेल्या २० वर्षांपासून देशात एअरबस हेलिकॉप्टर उडत आहेत. सध्याच्या स्थितीत ही संख्या १०० च्या आसपास आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड सरकारजवळ आणि देशातील काही उद्योगपतींकडेही हे हेलिकॉप्टर आहे. शिवाय एनडीआरएफ जवानांसाठी तसेच एअर अँबुलन्स म्हणूनही त्याची सेवा घेतली जाते. वजनाने हलके आणि दोन इंजिनच्या या हेलिकॉप्टरमध्ये १० व्यक्ती बसू शकतात.
दरम्यान, मिहानमधील इंडामेर एमआरओत झालेल्या या करारामुळे विदेशी हेलिकॉप्टरही दुरूस्ती आणि देखभालीसाठी येथे आणले जाऊ शकतील. सध्य स्थितीत देशात एअरबस व्यतिरिक्त अगुस्ता बेल आणि सिकास्कीचेही हेलिकॉप्टर आहेत.
एयर एंबुलेंस की बढ़ती मांग
देशात आता छोट्या विमानतळांच्या विकासावर जोर देण्यात येत आहे. कित्येक हायराईज ईमारतींवर हेलिकॉप्टर लॅण्डिंगची सुविधा आहे. आपातकालिन सेवेअंतर्गत एअर अँबुलन्सची मागणी सारखी वाढत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरची डिमांडही वाढत असून, त्यांच्या देखरेखीच्या व्यवसायालाही गती मिळत आहे.