आता वायदे बाजारात कापसाचे ‘गाठीं’ऐवजी ‘खंडी’त होणार व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2023 08:00 AM2023-02-05T08:00:00+5:302023-02-05T08:00:02+5:30

Nagpur News ‘सेबी’च्या आदेशान्वये कापसाचे व्यवहार गाठींऐवजी ‘खंडी’त हाेणार असून, नवीन नियमानुसार काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचे ‘एमसीएक्स’च्या सूत्रांनी सांगितले.

Now, instead of 'bales', cotton will be traded in 'Khandi' in the futures market | आता वायदे बाजारात कापसाचे ‘गाठीं’ऐवजी ‘खंडी’त होणार व्यवहार

आता वायदे बाजारात कापसाचे ‘गाठीं’ऐवजी ‘खंडी’त होणार व्यवहार

googlenewsNext
ठळक मुद्दे१३ तारखेपासून सुरू होणार नियमित साैदे

सुनील चरपे

नागपूर : ‘सेबी’ने कापसावरील वायदेबंदी हटविल्यानंतर कापसाचे वायदे साेमवार (दि. १३)पासून सुरू हाेणार असल्याचे ‘एमसीएक्स’ने स्पष्ट केले. ‘सेबी’च्या आदेशान्वये कापसाचे व्यवहार गाठींऐवजी ‘खंडी’त हाेणार असून, नवीन नियमानुसार काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचेही ‘एमसीएक्स’च्या सूत्रांनी सांगितले.

‘एमसीएक्स’वर पूर्वी कापसाचे व्यवहार गाठींमध्ये (१७२ किलाे रुई) व्हायचे. यात बदल करण्यात आला असून, यापुढे ते खंडीमध्ये (३५६ किलाे रुई) हाेतील. पूर्वी २५ गाठींचे एक ट्रेडिंग युनिट होते. ते आता ४८ खंडीचे करण्यात आले आहे. शिवाय, कमाल ऑर्डर साईजमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, कमाल ऑर्डर साईज १,२०० गाठींऐवजी ५७६ खंडीचा करण्यात आला आहे.

कापसाचे वायदे येत्या १३ फेब्रुवारीपासून एप्रिल, जून व ऑगस्ट महिन्यांतील वायदे सुरू हाेणार आहे. ‘सेबी’च्या नवीन नियमानुसार कापूस वायद्यांच्या सिंबाॅल, डिस्क्रिप्शन, ट्रेडिंग युनिट, कोटेशन, कमाल ऑर्डर साईज, टिक साईज, डिलिवरी युनिट आणि सेंटर, तसेच गुणवत्ता स्पेसिफिकेशन, आदींमध्ये बदल केला असल्याचे ‘एमसीएक्स’ने स्पष्ट केले आहे.

वायदे बाजारात रुईचे व्यवहार होतात. शेतकऱ्यांना त्यांचा कापूस वायद्यांमधून विकता येईल. व्यापारी व उद्योजकांना वायद्यांच्या माध्यमातून जोखीम व्यवस्थापन करता येईल. त्यातून कापसाचा व्यापार वाढण्यास, तसेच वायदे सुरू झाल्यानंतर कापूस दरात सुधारणा हाेणार असल्याची माहिती बाजार तज्ज्ञांनी दिली.

ओपन पोझिशनमध्ये बदल

कमाल ‘ओपन पोझिशन’मध्येही मोठे बदल केले असून, एका खरेदीदाराला ९,६०० खंडीची ओपन पोझिशन (२० हजार गाठी) घेता येईल. यापूर्वी ही मर्यादा ३ लाख ४० हजार गाठींची होती. तसेच एकत्रित खरेदीदारांसाठी ओपन इंटरेस्ट कमाल मर्यादा ९६ हजार खंडीची (२ लाख गाठी) करण्यात आली असून, पूर्वी ही मर्यादा ३४ लाख गाठी होती. या बदलांमुळे उद्योजक व व्यापाऱ्यांना व्यवहार करणे सोपे जाणार असल्याचे ‘पीएसी’ (प्राॅडक्ट ॲडव्हायझरी कमिटी-काॅटन)च्या सदस्यांनी सांगितले.

नवीन डिलिव्हरी सेंटर

पूर्वी ‘एमसीएक्स’चे यवतमाळ व जालना (महाराष्ट्र), काडी व मुंद्रा (गुजरात) आणि अदिलाबाद (तेलंगणा) येथे डिलिव्हरी सेंटर हाेते. यात आता पाच सेंटरची भर पडली आहेत. नवीन सेंटरमध्ये इंदोर (मध्य प्रदेश), भिलवाडा (राजस्थान), गुंटूर (आंध्र प्रदेश), रायचूर (कर्नाटक) आणि सेलम (तमिळनाडू) यांचा समावेश आहे.

‘सेबी’ने नियमांमध्ये केलेले बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. या बदलांमुळे वायदे बाजारातील नफेखाेरीचे प्रमाण कमी हाेईल. शिवाय, कापूस उत्पादक ते गारमेंट उद्याेजक या साखळीतील सर्व कड्यांना हे बदल फायदेशीर ठरणार आहेत.

- दिलीप ठाकरे, सदस्य,

पीएसी (एमसीएक्स-काॅटन) तथा ॲग्राेस्टार हातरून.

Web Title: Now, instead of 'bales', cotton will be traded in 'Khandi' in the futures market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस