शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

आता बचत गटांचे बनतील महासंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:42 AM

गावागावात पसरलेल्या महिला बचत गटांचा महासंघ बनणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतही होणार बदल प्रोफेशनल सांभाळणार बचतगटांची धुरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने ग्रामीण जीवन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिला बचत गटांवर विशेष फोकस केले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल, यासाठी नवीन यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. यासाठी मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गावागावात पसरलेल्या महिला बचत गटांचा महासंघ बनणार आहे.महिला बचतगटांना अतिशय कमी व्याजदरावर कर्ज देऊन त्यांना उद्योगशील बनविण्याचा प्रयोग सध्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू आहे़ आता शासनाने बचतगटांना कार्पोरेट क्षेत्राच्या अखत्यारित आणून त्यांना मार्केटिंगची जोड मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियानाचा विस्तार केला आहे़ नागपूर जिल्ह्यात ९ हजारावर बचत गट आहे.सर्वप्रथम तालुक्यातील गटांचा महासंघ तयार करण्यात येणार आहे. महासंघामध्ये जिल्हा महाव्यवस्थापक, प्रशिक्षक, मार्केटिंग आणि कर्जपुरवठा अशी चार पदे राहणार आहे. सोबतीला आणखी चार व्यवस्थापक, तालुकास्तरावर एक आणि जि.प.च्या सर्कलनुसार एक व्यवस्थापक राहणार आहे.यासर्व नियुक्त्या एमबीए पदवीप्राप्त संवर्गातील होणार आहे. सोबतच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कार्यरत अधिकाºयांचेही पद यात बदलणार आहे. ही नवीन यंत्रणा बचतगटांना व्यवसायाची तयारी, उत्पादन, विपणन पूर्व तयारी आणि विक्री, अशा सर्वस्तराची माहिती देणार आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांना थेट मिळणारा लाभ आहे, महासंघाद्वारे मिळणार आहे.नागपूर विभागाची भरती प्रक्रिया शासनपातळीवरून २१ ते २२ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत आहे़ महिला बचतगट सक्षम आणि कार्पोरेट क्षेत्रातील उद्योगांच्या स्पर्धेत ते उतरावे, या हेतूने हा उपक्रम शासन राबवित आहे़

महिला सक्षमीकरणाची चळवळ मजबूत होईलराज्यभरात महिला बचत गटांकडून चांगले काम होत आहे. या बचतगटांना मेक इन इंडियाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम शासन या उपक्रमातून करीत आहे़ बचतगटांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊन पोहोचेल़ महिला सक्षमीकरण चळवळ अधिक भक्कम होईल़- डॉ़ मकरंद नेटके,जिल्हा समन्वयक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

टॅग्स :Governmentसरकार