आता पोस्टाची कार्डलेस एटीएम सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 11:36 IST2019-09-07T11:35:01+5:302019-09-07T11:36:25+5:30

आता एटीएमकार्ड शिवायही पैसे काढता येणार आहे. ही सोय डाक विभागाने ग्राहकांना करून दिली आहे.

Now Cardless ATM service in post office | आता पोस्टाची कार्डलेस एटीएम सेवा

आता पोस्टाची कार्डलेस एटीएम सेवा

ठळक मुद्दे२ सप्टेंबरपासून शहरातील ६५ पोस्ट ऑफिसमध्ये सुरूआधार नंबर सांगा करा विड्रॉवल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आता एटीएमकार्ड शिवायही पैसे काढता येणार आहे. ही सोय डाक विभागाने ग्राहकांना करून दिली आहे. विशेष म्हणजे पैसे काढताना कुठल्याही एटीएम कार्डची गरज नाही. फक्त आधार नंबर सांगितल्यावर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी पोस्टाच्या कार्यालयात सांगितल्यास १० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते.
बँकिंग क्षेत्रात डाक विभागाने क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डाक विभागाने आधार सक्षम भुगतान प्रणाली (एईपीएस) सेवा सुरू केली आहे. नागपूर शहरात ६५ पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू झाली असल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी पत्रपरिषदेत दिली.
ते म्हणाले की, ही सेवा ग्रामीण जनतेसाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच शहरातही एटीएमचा दुरुपयोग होण्यापासून ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. डाक विभागाने सुरू केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) एक वर्ष पूर्ण झाले आहेत. देशभरातील १,३६,००० पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू असून एका वर्षाच्या कालावधीत पोस्टाने १ कोटीपेक्षा जास्त खाती उघडली आहे. यासाठी २ लाखाच्या जवळपास पोस्टमनला घरोघरी जाऊन बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रात ८,४८,०२१ खाती उघडण्यात आली आहे तर नागपूर क्षेत्रात ८६०५७ खाती उघडली आहे. सर्वात जास्त खाती उघडण्यात गडचिरोली जिल्हा अग्रेसर ठरला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेंतर्गत १ लाखावर खाती उघडलेली आहेत. यावेळी पत्रपरिषदेला वरिष्ठ शाखा प्रबंधक अभिजित जिभकाटे, संचालक पवनकुमार डालमिया, अधीक्षक टी.ए.व्ही शर्मा, सहा. संचालक शशीन राय उपस्थित होते.

विविध सुविधा
शिष्यवृत्ती, मनरेगामध्ये खाते उघडण्यासाठी डाक विभागाकडून महाविद्यालय व गावांमध्ये शिबिर लावण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून चेकबुक, मोबाईल मनी ट्रान्सफर, स्वीप इन स्वीप आऊट, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, रिटेल बिल पेमेंट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जायभाये यांनी सांगितले.

Web Title: Now Cardless ATM service in post office