शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आता नागपुरात पाणी चोरीविरोधात धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:53 PM

नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या प्रकल्पात १० जूनपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. ३० जूनपर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करीत आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी बुधवारी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यात पाणीचोरी करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबिवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टुल्लू पंप वापरणाऱ्यांच्या विरोधात गुरुवारपासून कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी घेतला पाणीसमस्यांचा आढावा : टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर १६ मेपासून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या प्रकल्पात १० जूनपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. ३० जूनपर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करीत आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी बुधवारी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यात पाणीचोरी करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबिवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टुल्लू पंप वापरणाऱ्यांच्या विरोधात गुरुवारपासून कारवाई केली जाणार आहे.आयुक्त अभिजित बांगर यांनी बोलाविलेल्या बैठकीला आमदार गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे,डॉ. मिलिंद माने, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, मनपातील सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनपाचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चोपडे, उपविभागीय अभियंता प्रणय नागदिवे, ओसीडब्ल्यूचे एच.आर. व्यवस्थापक के.एम.पी. सिंग, व्यवस्थापक (देखभाल व दुरुस्ती) कालरा आदी उपस्थित होते.पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी प्रकल्पात उपलब्ध पाण्याची माहिती दिली. पाटबंधारे विभागातर्फे पाणीपुरवठा केंद्राला देण्यात येते तितके पाणी केंद्रापर्यंत पोहचत नाही. त्याची कारणे शोधण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. शहरात पाण्याचा अपव्यय होतो. नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन अपव्यय टाळण्याचे आणि पाण्याच्या बाबतीत काटकसर करण्याचे आवाहन केले. कार वॉशिंग सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये पाण्याचा भरमसाट वापर केला जातो. अनेक ठिकाणी अनधिकृत जोडण्याही असल्याचे उपस्थित आमदारांनी निदर्शनास आणले. यासंदर्भात तातडीने अधिकाºयांनी पाहणी करून अशा अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. जनावरे धुणे, अंगणात पाणी टाकणे, गाड्या धुण्यासाठी पाण्याचा वापर करू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले.उपस्थित आमदारांनी पाण्याच्या समस्येवर चर्चा केली. प्रशासन पाण्याच्या नियोजनासंदर्भात घेत असलेले निर्णय नागरिकांनी पाळावेत. पाणी बचतीत नागरिकांनी स्वत: सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सर्व आमदारांनी केले. काही वस्त्यांमध्ये मोठे टँकर जात नसतील तर लहान टँकरची व्यवस्था ठेवावी, टँकरसंदभार्तील सर्व माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना वेळोवेळी देण्यात यावी, असेही निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. १० जूनपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असला तरी तो वाढविण्यासंदर्भात प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चौराई धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात मध्य प्रदेश शासनाशी चर्चा करावी, अशी विनंतीही राज्य शासनाला करण्यात आली आहे.गरज भासल्यास पोलिसांची मदत२० मे पासून असे नळजोडण्या नियमित करण्याची मोहीम सुरू होत आहे. नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन नळजोडण्या नियमित कराव्यात. मोहिमेदरम्यान नागरिकांच्या घरात जर अनधिकृत जोडणी आढळून आली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास पोलिसांची मदतही घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.अतिरिक्त पाण्यासाठी प्रयत्नपाटबंधारे विभागाने अतिरिक्त २० क्यूसेक्स पाणी द्यावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकता भासल्यास प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्यासाठी राज्य शासनाने त्यालाही मंजुरी दिल्याची माहिती आयुक्तांनी उपस्थितांना दिली. पाण्याचा अपव्यय टाळणे आणि काटकसर करणे हाच उपाय असून यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणीcommissionerआयुक्त