कुख्यात कडवला दोन दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 23:30 IST2020-07-28T23:29:32+5:302020-07-28T23:30:41+5:30

वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांची फसवणूक करणारा कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याला आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

Notorious Kadav get two-day police custody | कुख्यात कडवला दोन दिवस पोलीस कोठडी

कुख्यात कडवला दोन दिवस पोलीस कोठडी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांची फसवणूक करणारा कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याला आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
कडवविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सीताबर्डीतील फसवणुकीच्या गुन्ह्याच्या आरोपात गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कडवला कारागृहातून ताब्यात घेतले होते. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. कडव याने एका तरुणाला रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्याच्या वडिलांकडून सहा लाख रुपये घेतले. त्यानंतर नोकरीही दिली नाही आणि त्यांची रक्कमही परत केली नाही. गुन्हे शाखेच्या पथकाने सीताबर्डी ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ही कागदपत्रे सादर करून पोलिसांनी मंगेश कडवची न्यायालयाला कोठडी मागितली. न्यायालयाने कडवला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Notorious Kadav get two-day police custody