शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

नागपुरातील कुख्यात गवत्या राऊत स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 23:45 IST

अजनीतील कुख्यात गुंड गौतम ऊर्फ गवत्या देवीदास राऊत (वय २८) याच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला कारागृहात डांबण्यात आले.

ठळक मुद्दे१५ गंभीर गुन्हे दाखल : तडीपार करूनही नागपुरातच गुन्हेगारीत सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीतील कुख्यात गुंड गौतम ऊर्फ गवत्या देवीदास राऊत (वय २८) याच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला कारागृहात डांबण्यात आले. कुख्यात गवत्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्यानगर गल्ली नंबर ९ मध्ये राहतो. त्याच्याविरुद्ध १५ गंभीर गुन्हे दाखल असून तो अट्टल गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याला १९ एप्रिल २०१४ रोजी पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत अटक करून कारागृहात डांबले होते. एक वर्षानंतर तो बाहेर आला आणि परत गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र त्याची गुन्हेगारी सुरूच होती. त्यामुळे २०१७ मध्ये गवत्याविरुद्ध पुन्हा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तो वारंवार कारवाई करूनही जुमानत नसल्याचे पाहून ३ आॅगस्टला परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांनी त्याच्याविरुद्ध पुन्हा हद्दपारीची कारवाई केली. दोन वर्षात त्याला नागपुरात येण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र कुख्यात गवत्या नागपुरात येऊन गुन्हेगारीतही सक्रिय होता. मार्च २०२० मध्ये तो तडीपार असूनही त्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. तर, एप्रिल महिन्यात तो तलवार घेऊन धुमधाम करताना आढळला. जून महिन्यात तो साथीदारांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले.तो मोकाट असल्यामुळे कुणाला धोका होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याला एमपीडीए लावून कारागृहात डांबण्यातचे आदेश दिले. त्यानुसार गवतेविरुद्ध बुधवारी एमपीडीएच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. त्याला कारागृहात डांबण्यात आले.हाफ सेंच्युरी पूर्णपोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्या कार्यकाळात झालेली ही एमपीडीए ची ५० वी कारवाई ठरली. पोलीस आयुक्त उपाध्याय यांनी गेल्या चोवीस महिन्यात ४९ कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए लावण्याचे आदेश देऊन त्यांना कारागृहात डांबले. बुधवारी करण्यात आलेल्या गवत्यावरील कारवाईमुळे नागपुरात एमपीडीएची हाफ सेंच्युरी पूर्ण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक