संजय गायकवाड, कुटे, प्रताप अडसड यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:04 IST2025-03-04T13:04:09+5:302025-03-04T13:04:44+5:30

हायकोर्ट : चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

Notice to Sanjay Gaikwad, Kutte, Pratap Adsad | संजय गायकवाड, कुटे, प्रताप अडसड यांना नोटीस

Notice to Sanjay Gaikwad, Kutte, Pratap Adsad

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी निवडणुकीविरुद्धच्या प्रकरणामध्ये आमदार संजय गायकवाड, संजय कुटे व प्रताप अडसड यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.


पराभूत उमेदवार जयश्री शेळके (उद्धवसेना) यांनी गायकवाड (शिवसेना), स्वाती वाकेकर (काँग्रेस) यांनी कुटे (भाजप) तर, वीरेंद्र जगताप (काँग्रेस) यांनी अडसड (भाजपा) यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. गायकवाड यांनी बुलडाणा, कुटे यांनी जळगाव जामोद तर, अडसड यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघामधून विजय मिळविला आहे. त्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे.


निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते. त्याचे पालन झाले नाही. निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतरही सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर २७ दिले गेले नाही. पाच व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करण्यास मान्यता आहे. अनेकांनी याकरिता पैसे भरले. मात्र, व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली नाही, यासह विविध आरोप याचिकांमध्ये करण्यात आले आहेत. याचिकाकर्त्याच्यावतीने अॅड. आकाश मून व अॅड. ऋग्वेद ढोरे यांनी बाजू मांडली. 

Web Title: Notice to Sanjay Gaikwad, Kutte, Pratap Adsad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.