शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

फाईल अडवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 20:57 IST

आर्थिक टंचाई असल्याचे कारण सांगून फाईल अडवून ठेवण्याच्या प्रवृत्तीने स्थायी समितीही त्रस्त झाली आहे. संबंधित प्रकरणाला गांभीर्याने घेत स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी विकास कार्याशी संबंधित तीन फाईल रोखून धरल्याप्रकरणी प्रशासनाला जबाब मागितला आहे. तसेच एमएमसी अ‍ॅक्ट नियम ७२ ( क) अंतर्गत संबंधित फाईल अडवून धरणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याला कारण दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देनागपूर मनपा  स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक टंचाई असल्याचे कारण सांगून फाईल अडवून ठेवण्याच्या प्रवृत्तीने स्थायी समितीही त्रस्त झाली आहे. संबंधित प्रकरणाला गांभीर्याने घेत स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी विकास कार्याशी संबंधित तीन फाईल रोखून धरल्याप्रकरणी प्रशासनाला जबाब मागितला आहे. तसेच एमएमसी अ‍ॅक्ट नियम ७२ ( क) अंतर्गत संबंधित फाईल अडवून धरणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याला कारण दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.कुकरेजा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मागच्या बैठकीत १९९ प्रस्तावांना मंजुरी दिली होती. यापैकी तीन फाईली अडवून ठेवण्यात आल्याची माहिती उघडकीस आली. ९ आॅगस्ट २०१८ रोजी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत ‘मंजूर करण्यात आलेल्या फाईलपैकी किती फाईलींचे कार्यान्वयन झाले’, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. संंबधित अहवाल शुक्रवारी आयोजित बैठकीतही सादर होऊ शकला नाही. यामुळे नाराजी व्यक्त करीत कुकरेजा यांनी संबंधित प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले.स्थायी समितीचे अध्यक्ष कुकरेजा यांनी पत्रकारांना सांगितले की, एमएमसी अ‍ॅक्टमध्ये स्थायी समितीला वित्तीय मंजुरीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. परंतु असे पाहायला मिळते, की फाईल मंजूर झाल्यानंतरही प्रशासकीय स्तरावर ती फाईल अडकवून ठेवली जाते. यामुळेच आतापर्यंत मंजूर फाईलीच्या प्रगतीबाबतची सविस्तर माहिती मागवण्यात आली होती. शुक्रवारीसुद्धा एकत्रित अहवाल सादर होऊ शकला नाही. परिणामी कारण दाखवा नोटीस जारी करण्यास सांगितले आहे. माझ्या माहितीनुसार तीन फाईली जाणीवपूर्वक अडकवून ठेवलेल्या आहेत.२५ लाख रुपयापेक्षा कमी फाईलींची माहिती द्या२५ लाख रुपयांपेक्षा कमी कामाच्या फाईलसुद्धा मनपा स्थायी समितीच्या पटलावर ठेवणे आवश्यक राहील. यासंदर्भात शुक्रवारी बैठकीत प्रस्ताव होता, परंतु प्रशासनातर्फे अहवाल ठेवण्यात आला नाही. त्यामुळेच ताकीद देऊन पुढच्या बैठकीत रिपोर्ट टेबल करण्याचे निर्देश स्थायी समितीतर्फे देण्यात आले.वित्त अधिकाऱ्यांना फटकारफाईल अडकवून ठेवण्यात वित्त विभाग तरबेज आहे. आर्थिक टंचाईचे कारण सांगून वित्त अधिकारी मोना ठाकूर या ९५ टक्के फाईल अडकवून ठेवत आहेत. यासंदर्भातील तक्रार स्थायी समितीलाही करण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेत शुक्रवारी अध्यक्ष कुकरेजा आणि समिती सदस्यांनी वित्त अधिकाऱ्यांना फटकारले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर