लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या विविध भागात पूर व अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपचे सर्व आमदार व खासदार महिन्याभराचे वेतन मदतनिधीत देणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. नागपुरात ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात पूर परिस्थिती विदारक आहे. महायुती सरकारने सर्व भागांमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईसंदर्भात पाहणी करून नागरिकांना आवश्यक ती मदत करण्याचे ठरविले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
सरकार मायबाप म्हणून पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी सहा महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांना देण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत त्यांचे अभिनंदन आहे. मात्र सर्वच लोकप्रतिनिधी गडगंज नसतात. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना मिळणारे वेतन प्रवास भत्यासाठी मिळत असते. कुणाचीही काहीही भावना असली तरी पूरपरिस्थितीत राजकारण करणे योग्य नाही असे म्हणत त्यांनी वडेट्टीवार यांना टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आवश्यक त्या ठिकाणी जाऊन मदत करत आहे. मात्र मदत करण्याची भावना सर्वांची असली पाहिजे, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.
Web Summary : BJP MLAs and MPs will donate a month's salary for flood relief. Ravindra Chavan criticized Congress leader Vijay Vadettiwar's six-month salary pledge, stating not all representatives are wealthy. He emphasized unity and avoiding politics during the crisis.
Web Summary : भाजपा विधायक और सांसद बाढ़ राहत के लिए एक महीने का वेतन दान करेंगे। रवींद्र चव्हाण ने कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार के छह महीने के वेतन के वादे की आलोचना करते हुए कहा कि सभी प्रतिनिधि धनी नहीं हैं। उन्होंने संकट के दौरान एकता और राजनीति से बचने पर जोर दिया।