शहरं
Join us  
Trending Stories
1
'गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, आमची झालेली भेट केवळ अपघात'; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण
2
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना; शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
3
“संजय राऊतांनी शिवसेनेचे दोन तुकडे करुन दाखवले, राज ठाकरेंवर बोलू नये”; मनसे नेत्यांचा पलटवार
4
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
5
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
6
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
7
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...
8
Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."
9
Mandira Bedi : "ते माझं घर चालवायला येणार नाहीत, दुःख आहे जे...."; पतीच्या निधनावर पहिल्यांदा बोलली मंदिरा
10
तो लॅपटॉप सोबतच ठेवतो अन् मॅच संपल्यावर ऑफिस काम करतो! सौरभ नेत्रावळकरची कमिटमेंट
11
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
12
Fact Check: शपथविधी सोहळ्यात गडकरींनी PM मोदींना अभिवादन केले नाही? पाहा, दाव्यामागचे सत्य
13
लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल
14
Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन'
15
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
16
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
17
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
18
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'
19
BEST Bus Breakdowns: नुसता वैताग! बेस्ट बस भर रस्त्यात बंद पडण्याचं प्रमाण वाढलं, ६ महिन्यांत २११ वेळा घटना
20
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा

‘नोबेल’ विजेते कैलास सत्यार्थी संघमंचावर येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 11:53 PM

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघस्थानी उपस्थिती लावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे कोण राहणार, याबाबत उत्सुकता होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा हा उत्सव १८ आॅक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालअधिकारासाठी कार्यरत असलेले व ‘नोबेल’ पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.

ठळक मुद्देसंघाचा विजयादशमी उत्सव १८ आॅक्टोबरला : सरसंघचालक करणार मार्गदर्शन

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघस्थानी उपस्थिती लावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे कोण राहणार, याबाबत उत्सुकता होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा हा उत्सव १८ आॅक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालअधिकारासाठी कार्यरत असलेले व ‘नोबेल’ पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका, देशातील वर्तमान सामाजिक व आर्थिक स्थिती, महागाईचा पडणारा भार, पाकिस्तानकडून होणाºया कुरापती, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ.भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र तसेच राज्यातील मंत्रीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.स्वयंसेवकांमध्ये उत्साहदेशात सत्ताबदल झाल्यानंतरचा हा पाचवा तर पुढील लोकसभा निवडणुकांच्या अगोरदचा अखेरचा विजयादशमी उत्सव असेल. संघाच्या शाखांची वाढलेली संख्या, वाढता दबदबा आणि संघाच्या कार्यक्रमांबाबत जनतेमध्ये निर्माण झालेले आकर्षण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सोहळ्याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर