शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘इमर्जन्सी’साठी नाही एकही ‘एक्स्ट्रा कोच’

By admin | Updated: February 7, 2015 02:00 IST

रेल्वे गाडीतील एसी नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होते. तक्रार करूनही त्याचा काहीच फायदा होत नाही. प्रवाशी चेनपुलींग करून गोंधळ घालतात.

दयानंद पाईकराव नागपूर रेल्वे गाडीतील एसी नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होते. तक्रार करूनही त्याचा काहीच फायदा होत नाही. प्रवाशी चेनपुलींग करून गोंधळ घालतात. एखाद्या कोचमध्ये तांत्रीक बिघाड होतो. तर काही कोचमधील पंखे बंद पडतात. नागपूर रेल्वेस्थानकावर ही स्थिती नेहमीच उद्भवते. नागपुरात एकही ‘एक्स्ट्रा कोच’ नसल्याची धक्कादायक माहिती असून यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांनी गोंधळ घालण्याच्या घटनात सातत्याने वाढ होत आहे.नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १०० ते ११० रेल्वेगाड्या आणि ४० ते ५० हजार प्रवासी ये-जा करतात. अनेकदा रेल्वेगाड्यांच्या कोचमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवासी गाडीतील टीसीला त्याची तक्रार करतात. परंतु त्यांना दुरुस्तीच्या आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर अनेकदा प्रवाशांनी गोंधळ घातल्याच्या घटना घडल्या आहेत. बिघाड दुरुस्त झाल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन प्रवासी वारंवार चेन पुलींग करतात. उन्हाळ्यात एसी नादुरुस्त होण्याच्या अनेक घटना घडतात. यात इतर प्रवाश्यांनाही मनस्ताप होतो. वेळ निभावून नेण्यासाठी संबंधित बिघाड दुरुस्त करून गाडी पुढील प्रवासाला रवाना करण्यात येते. परंतु या पासून कायमचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आजपर्यंत झाला नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर अशी आपातकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी काही अतिरिक्त कोच ठेवण्याची गरज आहे. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर असा एकही अतिरिक्त कोच ठेवण्यात येत नाही. मुंबईला मात्र अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास अतिरिक्त कोचची व्यवस्था आहे. त्यामुळे नागपुरातही अतिरिक्त कोच ठेऊन प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)