शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

'इतरांची शांतता भंग करून देवाची प्रार्थना करावी, असा आदेश कोणताही धर्म देत नाही' हायकोर्टाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:16 IST

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : मशीद सचिवाची याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्माचे पालन करण्यासाठी लाऊडस्पीकरसारखी ध्वनिप्रदूषण करणारी साधने वापरणे कोणत्याही कायद्यानुसार बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तिद्वय अनिल पानसरे व राज वाकोडे यांनी एका प्रकरणामध्ये दिला. गोंदियामधील मशीद-ए-गौसिया येथे लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मिळावी, यासाठी सचिव सय्यद इकबाल अली यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, त्यांना यासंदर्भात कोणतीही कायदेशीर तरतूद दाखवता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय देऊन सदर याचिका फेटाळून लावली.

इतरांची शांतता भंग करून देवाची प्रार्थना करावी किंवा प्रार्थना करण्यासाठी लाऊडस्पीकरसारखी ध्वनिप्रदूषण करणारी साधणे वापरावीत, असा आदेश कोणताही धर्म देत नाही. देशातील नागरिकांना शांतता उपभोगण्याचा मूलभूत अधिकार आहे. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध, आजारी व मनोविकारग्रस्त व्यक्तींना शांततेची नितांत गरज असते.

राज्यघटनेतील आर्टिकल २१ मध्ये समाविष्ट असलेला जीवनाचा अधिकार हा केवळ जगण्याचा किंवा अस्तित्वाचा नाही तर, सन्मानाने जगण्याचीही हमी देतो. त्यामुळे कोणालाही त्याच्या मर्जीविरोधात काहीही ऐकण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : No religion orders disturbing peace for prayer: High Court clarifies.

Web Summary : High Court stated that no religion mandates using loudspeakers for prayer by disturbing others' peace. Citizens have the right to peace, especially children, the elderly, and the sick. Forcing unwanted listening violates the right to life with dignity.
टॅग्स :nagpurनागपूर