नो रिअ‍ॅक्शन, ओन्ली अ‍ॅक्शन!

By Admin | Updated: August 20, 2014 01:02 IST2014-08-20T01:02:18+5:302014-08-20T01:02:18+5:30

आपल्या हद्दीत दुसऱ्या अधिकाऱ्याने शिरून कारवाई केल्यास ‘त्या’ भागाच्या पोलीस अधिकाऱ्याचा इगो हर्ट होतो. त्याची नंतर रिअ‍ॅक्शनही दिसते. मात्र, नागपुरात नुकतेच रुजू झालेले तीन पोलीस उपायुक्त इगो

No Reaction, Only Action! | नो रिअ‍ॅक्शन, ओन्ली अ‍ॅक्शन!

नो रिअ‍ॅक्शन, ओन्ली अ‍ॅक्शन!

डीसीपी वन थ्री का फोर : गुन्हेगारांमध्ये खळबळ
नागपूर : आपल्या हद्दीत दुसऱ्या अधिकाऱ्याने शिरून कारवाई केल्यास ‘त्या’ भागाच्या पोलीस अधिकाऱ्याचा इगो हर्ट होतो. त्याची नंतर रिअ‍ॅक्शनही दिसते. मात्र, नागपुरात नुकतेच रुजू झालेले तीन पोलीस उपायुक्त इगो आणि रिअ‍ॅक्शनला झिडकारून ‘ओन्ली अ‍ॅक्शन’ला महत्त्व देणारे आहेत. हे डीसीपी आहेत, अभिनाशकुमार (झोन वन), निर्मला देवी एस. (झोन थ्री) आणि ईशू सिंधू (झोन फोर)! नागपुरात येण्यापूर्वी अभिनाशकुमार वर्धा येथे पोलीस अधीक्षक होते. ईशू सिंधू औरंगाबाद ग्रामीणला अधीक्षक तर, निर्मला देवी औरंगाबादलाच अतिरिक्त अधीक्षक होत्या. अर्थात अभिनाश आणि ईशू एकाच बॅचचे आहेत तर, निर्मला देवीसुद्धा ईशू यांच्यासोबत काम करीत होत्या. त्यामुळे त्यांच्यात ताळमेळ आहे. गुन्हेगारांवर जरब बसविण्याची झोन वन-थ्री-फोरची योजना आहे. (प्रतिनिधी)

Web Title: No Reaction, Only Action!