शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

कोणीही थांबलं नाही... मृत पत्नीला दुचाकीला बांधून पतीचा दुर्दैवी प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:49 IST

Nagpur : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर धक्कादायक प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू... महामार्गावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती... पती अमित यादवने डोळ्यांतून अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला; पण कोणीही थांबले नाही. शेवटी हताश पतीने पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. जणू माणुसकी मेली की काय, अशी वेदनादायक घटना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोरफाट्यावर रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

ग्यारसी अमित यादव (३१) हिचा पतीसोबतच्या प्रवासात दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. पाऊस कोसळत होता, महामार्गावर गाड्यांची वर्दळ होती. पण मृतदेह उचलून मदत करणारा एकही हात पुढे आला नाही. त्याने तिचा मृतदेह चक्क मोटारसायकलवर मागे बांधला आणि सुसाट वेगाने निघाला. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. १०) सायंकाळी घडला. पोलिसांनी या घटनाक्रमाची व्हिडिओ क्लिप तयार केली.

ग्यारसी अमित यादव ही मूळची करणपूर, जिल्हा सिवनी, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. ती मागील १० वर्षापासून पती अमित भुरा यादव (३५) याच्यासोबत कोराडी नजीकच्या लोणारा येथे राहायची. रक्षाबंधन असल्याने ती पतीसोबत एमएच-४०/डीबी-१९८३ क्रमांकाच्या मोटारसायकलने लोणारा येथून देवलापारमार्गे करणपूरला जात होती.

दरम्यान, देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकने (आयशर) त्यांच्या मोटारसायकलला कट मारला व ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिच्या मृत्यू झाला. त्याचवेळी जोरात पाऊस सुरू असल्याने अमितने नागरिकांना मदत मागितली. कुणीही मदत करायला तयार नसल्याने त्याने तिचा मृतदेह चक्क मोटारसायकलवर मागे बांधला आणि कोराडीच्या दिशेने निघाला.

दरम्यान, या प्रकाराची माहिती कोराडी पोलिसांना मिळाली. महामार्ग पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घाबरला असल्याने कुठेही न थांबता सुसाट निघाला. दरम्यान, पोलिसांनी त्याला अडवून ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला. तपास देवलापार पोलिसांकडे वर्ग करणार असल्याची माहिती कोराडीचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेंडकर यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात