शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री बीज तयार करण्यासाठी आता इंजेक्शन नव्हे गोळ्या

By सुमेध वाघमार | Updated: June 5, 2023 18:40 IST

Nagpur News आयव्हीएफ या तंत्रज्ञानात आता अधिक सुधारणा झाली असून, इंजेक्शनऐवजी गोळ्या उपलब्ध झाल्या असल्याची माहिती भारतीय वंध्यत्व सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. डी. नायर यांनी दिली.

सुमेध वाघमारे नागपूर : वंध्यत्त्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर मात करण्यासाठी ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’ म्हणजे ‘आयव्हीएफ’ प्रभावी पर्याय आहे. या उपचार पद्धतीमुळे दरवर्षी हजारो जोडप्यांची संसारवेल यशस्वीपणे फुलवली जात आहे. या प्रक्रियेत स्त्रीला इंजेक्शन्स देऊन तिच्या शरीरात स्त्री बीज तयार केली जातात. परंतु, आता इंजेक्शनऐवजी गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. या ‘प्रोजेस्टिन - प्राइमड ओव्हेरियन स्टिम्युलेशन’चे (पीपीओएस) अनेक फायदे आहेत, अशी माहिती भारतीय वंध्यत्व सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. डी. नायर यांनी दिली.

नागपूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी सोसायटीच्यावतीने (एनओजीएस) आयोजित दुसऱ्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. वनिता जैन, इंडियन फर्टिलिटी सोसायटीचे पुढील वर्षाचे अध्यक्ष डॉ. पंकज तलवार, डॉ. नटचंद्र चिमोटे, डॉ. बिंदू चिमोटे, एनओजीएसच्या अध्यक्ष डॉ. सुषमा देशमुख, सचिव डॉ. प्रगती खळतकर आदी उपस्थित होत्या.

डॉ. नायर म्हणाले, ‘पीपीओएस’ हा एक प्रभावी डिम्बग्रंथी उत्तेजक करणारा ‘प्रोटोकॉल’ आहे. ज्यात सकारात्मक परिणाम दिसून येतात. यात पारंपरिक इंजेक्शनची जागा तोंडवाटे घेणाऱ्या गोळ्यांनी घेतली आहे. इंजेक्शनच्या बदल्यात गोळ्यांचा वापर सुलभ असून, याचे फायदेही दिसून येत आहेत. इंजेक्शनच्या तुलनेत गोळी स्वस्त आहे. या नवीन तंत्रांची प्रभाविता आणि सुरक्षितता सत्यापित करण्यासाठी पुढील संशोधन आणि क्लिनिकल चाचण्या चालू आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य