शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबोतच्या संबंधांवर काय म्हणाले?
3
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
4
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
5
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
6
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
7
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
8
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
9
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
10
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
12
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
13
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
14
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
15
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
16
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
17
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
18
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
19
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
20
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
Daily Top 2Weekly Top 5

ना वीज, ना रस्ते, ना पाणी ! मेळघाटातील दुर्गम २२ गावे मूलभूत सुविधांपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:44 IST

हायकोर्टाकडून गंभीर दखल : राज्य सरकारला नोटीस, सहा आठवड्यांत मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुक्यामधील २२ गावांत वीज, पाणी, रस्ते, पक्की घरे इत्यादी मूलभूत सुविधा नसल्याचा दावा करणाऱ्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी गंभीर दखल घेऊन राज्य सरकारसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावली आणि यावर सहा आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील प्रतिवादींमध्ये ग्राम विकास विभागाचे सचिव, ऊर्जा विभागाचे सचिव, वन व महसूल विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे सचिव, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे महासंचालक, अमरावती जिल्हाधिकारी आदींचा समावेश आहे.

रंगूबेली गट ग्रामपंचायतीमधील कुटंगा, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, खोपमार यासह रायपूर, बोराटखेडा, रेट्याखेडा, मेळघाट इत्यादी २२ गावे दुर्गम क्षेत्रात असून या गावांना जलजीवन मिशन, हर घर बिजली, प्रधानमंत्री सौरऊर्जा, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व प्रधानमंत्री ग्रामीण आवास या कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा सन्मानाने व सुरक्षितपणे जगण्याचा मूलभूत अधिकार हिरावला गेला आहे. 

याचिकाकर्त्यांची नावे वगळली....

ही याचिका अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे व विद्यार्थी प्रकाश पराते यांनी दाखल केली होती. न्यायालयाने काही तांत्रिक कारणांमुळे या दोघांची नावे वगळून ही याचिका स्वतः चालविण्याचा निर्णय घेतला व याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. निखिल कीर्तने व अॅड. पार्थ मालविया यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Melghat's 22 remote villages lack basic amenities: No electricity, roads, water!

Web Summary : Bombay High Court addresses petition highlighting the lack of basic facilities like electricity, water, and roads in 22 remote villages of Melghat. The court issued notices to the state government and other respondents, seeking a response within six weeks. Advocate Nikhil Kirtane and Advocate Parth Malviya were appointed as court amicus curiae.
टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावतीnagpurनागपूर