शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

वादळी वारा नागपुरातील बत्ती गुल

By आनंद डेकाटे | Updated: May 9, 2024 15:48 IST

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला : मुसळधार पावसाने झोडपले, आकाश काळवंडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यात अनेक भागात वृक्ष व त्याच्या फांद्या वीज तारांवर पडल्या. त्यामुळे या भागासह तसेच काही तांत्रिक कारणाने नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. वीज कर्मचाऱ्यांनी तक्रार मिळताच घटनास्थळ गाठले. परंतु पावसाचा जोर जास्त असल्याने बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेच्या दुरुस्तीला अडचण येत होती.

हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला. सकाळीच वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार बरसला. हवामान विभागाने ९ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवित ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तसेच १० ते १२ मे दरम्यान यलो अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे.

गुरूवारी वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील झाडांच्या फांद्या तुटून वीज तारांवर, फिडरवर पडल्याने अनेक भागातील बत्ती सकाळीच गुल झाली. वीज पुरवठा खंडित झालेल्या भागात गोरेवाडा, बोरगाव, काटाेल रोड, अनंतनगर, जाफरनगरसह वंजारी नगर, प्रतापनगर, जानकीनगर, भोले बाबा नगर, विठ्ठल नगर, सरस्वती नगर, धरमपेठचा काही भाग, गायत्री नगर, दक्षिण नागपूरचा काही भाग, मध्य नागपुरच कही भागसह शहरातील अनेक भागांचा समावेश होता. खंडित झाल्याची माहिती कळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज यंत्रणेतील दोष शोधण्याचे काम हाती घेत दुरुस्ती सुरू केली. काही भागात पावसाचा जोर जास्त असल्याने वीज कर्मचाऱ्यांना दुरुस्ती करता येत नव्हती. त्यामुळे ते पाऊस कमी होण्याची वाट बघत होते. दरम्यान काम शक्य असलेल्या परिसरात मात्र काही मिनीटात वीज पुरवठा सुरळीत केल्याचा महावितरणचे दावा आहे. दरम्यान वृक्ष वीज यंत्रणेवर पडलेल्या भगत अग्निशमन दलाची मदत घेतली जाणार आहे. वृक्ष बाजूला सारल्यावर वीज तार जोडण्यासह इतर कामे केली जाईल. त्यापूर्वी वीज पुरवठा इतर भागातून वाळवून वीज सुरळीत करण्याचे महावितरणकडून प्रयत्न होणार आहे.

 

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर