शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा ग्रा.पं.च्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST

भिवापूर : तालुक्यातील मानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा नूतन वसंता काळे यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव मंग‌ळवारी (दि. ५) ...

भिवापूर : तालुक्यातील मानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा नूतन वसंता काळे यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव मंग‌ळवारी (दि. ५) पारित झाला आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार दिनेश पवार यांच्या उपस्थितीत आयोजित विशेष सभेत सातही सदस्यांनी एकत्र येत सरपंच नुूतन काळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित केला.

सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत नूतन वसंता काळे या थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या. मात्र सदस्यांना विश्वासात न घेता कामे होत असल्यामुळे सुरुवातीपासूनच मानोरा ग्रामपंचायतीचा कारभार वादग्रस्त राहिला. त्यामुळे गत ३० डिसेंबर रोजी सात सदस्य संख्या असलेल्या मानोरा‌ ग्रामपंचायतीच्या सातही सदस्यांनी एकत्र येत सरपंच नूतन काळेविरुद्ध अविश्वास ठराव घेतला. यात नियोजित वेळेत काम न करणे, सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर काम करणे, ग्रामपंचायतस्तरावर विषय समिती तयार न करणे, ग्रामपंचायत सदस्यांना अपमानास्पद बोलणे व त्यांच्याशी गैरवर्तणूक करणे आदी आरोप करण्यात आले. उपसरपंच मिथून माटे, सदस्य करण लुटे, प्रमोद गोमकर, मनोरमा वासनिक, सुनंदा गजभिये, छाया मलवंडे, नीता गोमकर यांनी या अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली होती. गत ३० डिसेंबर रोजी सदर अविश्वासाची प्रत नायब तहसीलदार दिनेश पवार यांना देण्यात आली. त्या आधारावर तहसील कार्यालयाने मंगळवारी मानोरा ग्रामपंचायतमध्ये अविश्वासाबाबत विशेष सभेचे आयोजन केले होते. नायब तहसीलदार दिनेश पवार यांच्या उपस्थितीत आयोजित या सभेत सातही सदस्यांनी नूतन काळे यांच्या विरोधात अविश्वास आणला. शांतता कायम राहण्यासाठी यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चंगोले यांच्यासह पोलीस कर्मचारीसुद्धा उपस्थित होते.

ग्रामसभा ठरविणार सरपंचाचे भविष्य?

यापूर्वी सदस्यातून सरपंचाची निवड होत असल्यामुळे विविध कारणास्तव सदस्यांना सरपंचावर अविश्वास आणून थेट पायउतार करता यायचे. मात्र राज्यात भाजप-सेनेचे सरकार येताच जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत अवलंबिल्या गेली.‌‌ त्यानुसार मानोरा ग्रामपंचायतच्या सरपंच नूतन काळे या थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्या सदस्यांच्या अविश्वासाने थेट पायउतार होणार नाही तर, या अविश्वासाच्या आधारावर आता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येईल. त्यात ग्रामस्थांचे मतदान होईल. एकप्रकारे येथे पदारूढ सरपंचाविरुद्ध ग्रामसभेच्या माध्यमातून ‌मिनी निवडणूक होईल. जनतेचा कौल ज्या बाजूने असेल तसा निकाल हाती येईल. आता मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद झाली आहे.