वेळीच सुधारा, नाही तर पुन्हा वीसचे दोन व्हाल : शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:30 IST2024-12-22T07:30:01+5:302024-12-22T07:30:10+5:30

निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही विरोधकांच्या वागणुकीत बदल नाही

No change in the behavior of the opposition even after losing the elections says eknath shinde | वेळीच सुधारा, नाही तर पुन्हा वीसचे दोन व्हाल : शिंदे

वेळीच सुधारा, नाही तर पुन्हा वीसचे दोन व्हाल : शिंदे

नागपूर: अडीच वर्षे आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणून विरोधकांनी हिणवले. याला आम्ही कामातून उत्तर दिले. परिणामी आम्हाला हिणवणारे विधानसभा निवडणुकीत ५६ वरून २० वर आले. यात सुधारणा झाली नाही तर पुढे यातूत शून्य निघून जाईल व दोन वर याल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी नामोल्लेख न करता उद्धव ठाकरे यांना लगावला. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही विरोधकांच्या वागणुकीत बदल नाही. खोटे आरोप करण्याऐवजी जनतेचे प्रश्न मांडतील अशी अपेक्षा शिंदे यांनी शनिवारी विधान परिषदेत व्यक्त केली. विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या नियम २५९ आणि २६० अन्वये झालेल्या चर्चेला शिंदे यांनी उत्तर दिले.

Web Title: No change in the behavior of the opposition even after losing the elections says eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.