शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपुरात डबल डेकर पुलासाठी एनएचएआयकडून अजूनही मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:26 PM

एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान ५.३ किलोमीटरच्या फोरलेन डबलडेकर फ्लायओव्हरला अजूनही नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया(एनएचएआय)ची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देटेक्निकल अप्रुव्हल कमिटीमध्ये झाली चर्चा : वाहतुकीला होतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान ५.३ किलोमीटरच्या फोरलेन डबलडेकर फ्लायओव्हरला अजूनही नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया(एनएचएआय)ची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.

एनएचएआयकडून सांगण्यात आले की, पुलाच्या निर्माणीच्या डिझाईनसंदर्भात त्यांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही. महामेट्रोच्या वतीने सांगण्यात येत आहे की, प्रोजेक्ट एचएचएआयचा असला तरी, त्याचे निर्माण आम्ही करीत आहो. एनएचएआय नागपूरद्वारे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर महामेट्रो व एनएचएआय मुख्यालयात चर्चा सुरू आहे. यादरम्यान कामठी रोडवर एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान वाहतुकीला त्रास होत आहे. बऱ्याच काळापासून निर्माणकार्य सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. डबलडेकर पुलाचे काम २०१७ ला सुरू झाले होते. २०२० मध्ये पुलाचे काम पूर्ण करायचे आहे. असे असले तरी, प्रकल्पाची निर्धारित कालावधीसंदर्भात कुठलाही खुलासा करण्यात आला नाही.कनेक्टीव्हीटीची अडचणएलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान कुठेही कनेक्टीव्हीटी दिली गेली नाही. जसे कडबी चौक, इंदोरा चौक येथील वाहन चालक या पुलाचा वापर करू शकणार नाही. कामठीहून रिझर्व्ह बँक चौकाकडे येणारे वाहन चालक या पुलाचा उपयोग करू शकतात. पुलाच्यावर मेट्रो धावणार आहे.एनएचएआयचे काही काम शिल्लक आहेडबलडेकर पुलाच्या निर्माणकार्यात विलंब झाला आहे, मात्र अन्य कार्य सुरू आहे. सध्या तरी एनएचएआयकडून स्वीकृती मिळाली नाही, मात्र लवकरच मिळून जाईल. गुरुद्वाराजवळील रेल्वे अंडरब्रीजच्या भागात जनरल अरेंजमेंट ड्रॉईंगला मंजुरी मिळाली आहे.बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो२०१६-१७ मध्ये कामठी रोडवरील एनएचएआयच्या फ्लायओव्हर प्रोजेक्टला महामेट्रोमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. महामेट्रोकडून सुरू असलेल्या कामामध्ये एनएचएआयने काही सूचना केल्या होत्या. नुकतीच टेक्निकल अप्रुव्हल कमिटीची बैठक झाली आहे. सध्यातरी लेखी रूपात महामेट्रोला एनएचएआयकडून मंजुरी मिळाली नाही.नरेश वडेट्टीवार, महाप्रबंधक (टेक्निकल), एनएचएआय५५ टक्के कामाचा दावा

  • महामेट्रोने सीताबर्डी एक्स्चेंजपासून ऑटोमोटिव्ह चौकापर्र्यंत वायाडक्टचे काम ५५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.
  •  आतापर्यंत १६४९ मधून १६०६ पाईल, २१९ पाईल कॅप पैकी २०० कॅप, २१९ पियर पैकी १८१ पियर, २१९ पियर कॅप पैकी १६० कॅप बनविण्यात आले आहे.
  • एनएचएआयतर्फे ३३ पैकी २९ पियर आर्म व महामेट्रोतर्फे ३३ पैकी २२ पियर आर्म तयार करण्यात आले आहे.
  •  सेग्मेंट कास्टिंग २३१९ पैकी १२५७, स्पेन इरेक्शन २२१ पैक ४४ पूर्ण झाले आहे.
  •  ७.२३ कि.मी.च्या रिच-२ मध्ये ७ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे.
  •  या मार्गावर रिझर्व बँक, खासगी बँक, औद्योगिक प्रतिष्ठान, इंजिनीअरींग कॉलेज व नॅशनल हायवेचा भाग आहे.
  •  या रस्त्यावर नेहमीच वाहतूक जास्त असते.
टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर