शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सभागृहाचे अधिकार वाढणार !

By admin | Updated: May 16, 2015 02:34 IST

महापालिका सभागृहाचे अधिकार वाढविण्याच्या दिशेने स्थायी समितीने एक पाऊल पुढे टाकले आहे.

नागपूर : महापालिका सभागृहाचे अधिकार वाढविण्याच्या दिशेने स्थायी समितीने एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम (एमआरटीपी) १९९६ च्या तार उपनियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने शुक्रवारी मंजूर केला. आता संबंधित प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला जाईल. या कायद्यात सुधारणा करण्याचा पूर्ण अधिकार राज्य सरकारला आहे. एमआरटीपी कायद्यातील काही उपनियमांमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्त व नासुप्र सभापतींना आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय महापालिका सभागृहाला थांबविता येत नाहीत. अधिकाऱ्यांनी घेतलेले बरेच निर्णय लोकभावना विचारात घेऊन असलेले नसतात, असा सूर लोकप्रतिनिधींकडून आळवल्या जातो. त्यामुळेच या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक अ‍ॅड. संजय बालपांडे यांनी प्रस्ताव सादर करीत या कायद्यात काही बदल सुचविले. समितीच्या सर्व सदस्यांनी त्यास एकमताने मंजुरी दिली. बालकनी व खोलीच्या दरम्यान भिंत बांधायची असेल, पायऱ्यांसाठी लागणारी जागा, लिफ्ट रूम, लॉबी आदीसाठी प्रीमियम शुल्क निश्चित करण्याचा अधिकार मनपा आयुक्त व नासुप्र सभापतींना आहे.स्थायी समितीत शुक्रवारी मांडलेल्या प्रस्तावात संबंधित अधिकार महापालिका सभागृह किंवा नासुप्र विश्वस्त मंडळाला देण्याची शिफारस करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)