शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

मनपा : वित्त अधिकारी व निगम सचिव कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:36 AM

महापालिकेत निगम सचिव आणि प्रमुख लेखा व वित्त अधिकारी ही पदे महत्त्वाची आहेत. परंतु ‘अ’ वर्गात समावेश असलेल्या नागपूर मनपात ही दोन्ही पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहेत. अद्याप पूर्णवेळ अधिकारी मिळालेले नाहीत. अतिरिक्त प्रभारामुळे नगरसेवक व कर्मचारी त्रस्त असून त्यांना या पदावर पूर्ण वेळ अधिकारी कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत निगम सचिव आणि प्रमुख लेखा व वित्त अधिकारी ही पदे महत्त्वाची आहेत. परंतु ‘अ’ वर्गात समावेश असलेल्या नागपूर मनपात ही दोन्ही पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहेत. अद्याप पूर्णवेळ अधिकारी मिळालेले नाहीत. अतिरिक्त प्रभारामुळे नगरसेवक व कर्मचारी त्रस्त असून त्यांना या पदावर पूर्ण वेळ अधिकारी कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे.प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे सेवानिवृत्त झाल्यानंतर अनंत मडावी यांचे काही महिने वगळता हे पद रिक्तच आहे. या पदाचा अतिरिक्त प्रभार उपायुक्त नितीन कापडणीस, मुख्य लेखा परीक्षक मोना ठाकूर, आमोद कुंभोजकर, उपायुक्त निर्भय जैन आदींनी सांभाळला आहे. सध्या नासुप्रचे वित्त व लेखा अधिकारी हेमंत ठाकरे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त प्रभार आहे. त्यांची अमरावतीला बदली झाली आहे. सध्या ते दोन्ही ठिकाणचा पदभार सांभाळून आपले कौशल्य पणाला लावत आहेत.वित्त विभागात कामे होत नसल्याबाबत नगरसेवक व कंत्राटदारांच्या तक्रारी आहेत. वर्षानुवर्षे फायली प्रलंबित असल्याने विकास कामांना फटका बसला आहे. काही मर्जीतील कंत्राटदार वगळता इतरांना बिलासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.मनपात निगम सचिवाचे पद महत्त्वाचे समजले जाते. परंतु हरीश दुबे सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदाचा कारभार प्रभारी सांभाळत आहेत. उपायुक्त रंजना लाडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार होता. परंतु सभागृहात उपस्थित तांत्रिक मुद्यांना उत्तरे देताना प्रशासनाला नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे उपायुक्त सुभाषचंद्र जयदेव यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र काही महिन्यापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर पुन्हा लाडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार आला. सध्या त्या रजेवर असल्याची माहिती आहे.निवृत्त निगम सचिवांच्या चकरानिवृत्त निगम सचिव हरीश दुबे यांची पुन्हा या पदावर वर्णी लावण्याचे सत्तापक्षातील काही वजनदार नगरसेवकांनी त्यांना आश्वासन दिले आहे. या आश्वासनानुसार नियुक्तीपूर्वीच दुबे अधूनमधून मनपातील निगम सचिवांच्या कक्षात बसून विभागाचा आढावा घेत असतात.५० टक्के पदे रिक्तमनपामध्ये वर्ग १ ते वर्ग ४ मिळून ११ हजार ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी ७ हजार ७५० पदे भरली असून तब्बल ४ हजार २५० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ३५ टक्के आहे. वर्ग १ मधील २१४ पैकी १०० हून अधिक पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची ६१ पैकी ५० पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मधील ३ हजार ८१२ पैकी २ हजार २५० पदे रिक्त आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची ४ हजार ७५० पदे रिक्त आहे. याचा विचार करता मनपात ५० टक्के पदे रिक्त आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका