शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

मनपा  प्रशासन, पदाधिकाऱ्यांना मुंढे यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:10 AM

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची बातमी येताच दुसऱ्या दिवसापासून अधिकारी, कर्मचारी वेळेवर कार्यालयात येऊ लागले आहेत. भाजपाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये मुंढे यांच्याबाबत अस्वस्थता पसरली आहे.

ठळक मुद्देसोमवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता : रविभवनात थांबणार आयुक्त मुंढे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची बातमी येताच दुसऱ्या दिवसापासून अधिकारी, कर्मचारी वेळेवर कार्यालयात येऊ लागले आहेत. भाजपाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये मुंढे यांच्याबाबत अस्वस्थता पसरली आहे. सर्वजण आपसात चर्चा करून त्यांच्या स्वभावाबाबत चौकशी करीत आहेत. दरम्यान सत्तापक्षाने नासुप्रचे मनपात विलिनीकरणाचा मुद्दा घेऊन विशेष सभा बोलाविल्यामुळे त्यांचे स्वागत महापालिका सदनात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सूत्रांनुसार मुंढे सध्या रविभवनात थांबणार आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांच्या सचिवांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहुन रविभवनात मुंढे यांच्यासाठी एक खोली राखीव ठेवण्यास सांगितले आहे. २५ जानेवारी २०२० पासून खोली आरक्षित ठेवण्यास म्हटले आहे. सोबतच पत्रात २७ जानेवारी २०२० रोजी मुंढे पदभार स्वीकारणार असल्याचा उल्लेख आहे. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या रुपाने ओळखल्या जाणाऱ्या मुंढे यांच्या येण्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काहीजण आपल्या सेवानिवृत्तीची तारीख सांगत आहेत तर भाजपा नगरसेवकांमध्ये मुंढे दीड ते दोन डझन भाजपा नगरसेवकांची यादी घेऊन येत असल्याची चर्चा आहे. त्यांच्याशी निगडित प्रकल्प व त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणार आहेत. काहींच्या मते आयएएस अधिकारी कुणाचे ऐकत नाहीत. त्यामुळे यादी घेऊन येणे किंवा टार्गेट ठरवून काम करण्याची शक्यता नाही. त्यांच्या कामाची वेगळी शैली आहे. त्यात त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेत बदल घडून येणार आहे.बांगर यांच्या कामाची स्तुतीअभिजित बांगर यांनी ज्या पद्धतीने महापालिका आयुक्त असताना प्रशासन आणि सत्तापक्षाला सोबत घेऊन काम केले, त्याच चर्चा सत्तापक्ष तसेच विरोधी पक्षात होत आहे. नगरसेवकांच्या मते त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करू द्यायला हवा होता. त्यांच्यामुळे स्वच्छतेच्या रँकिंगमध्ये नागपूर पुढे जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार बांगर आपल्या बदलीमुळे नाराज आहेत. त्यांना नव्या ठिकाणी नेमणूक मिळाली नाही. शुक्रवारी दिवसभर बांगर शहरात होते. अनेक अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. ते महापालिका मुख्यालयातही आले नाही. बैठकीसाठी ते ताप असला तरी कार्यालयात येत होते.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका