नितीन राऊत तामिळनाडूसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:49 IST2021-03-24T23:48:20+5:302021-03-24T23:49:45+5:30

Nitin Raut तामिळनाडूमध्ये हाेणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ऊर्जामंत्री व अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डाॅ. नितीन राऊत यांची स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसने नियुक्ती केली आहे.

Nitin Raut is the star campaigner of the Congress for Tamil Nadu | नितीन राऊत तामिळनाडूसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक

नितीन राऊत तामिळनाडूसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : तामिळनाडूमध्ये हाेणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ऊर्जामंत्री व अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डाॅ. नितीन राऊत यांची स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसने नियुक्ती केली आहे.

येत्या ६ एप्रिलला एकाच टप्प्यात तामिळनाडूत विधानसभा निवडणूक हाेणार आहे. काँग्रेसचे काेषाध्यक्ष पवनकुमार बंसल यांनी काँग्रेसच्या ३० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयाेगाकडे पाठविली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून केवळ डाॅ. नितीन राऊत आणि संजय दत्त यांचाच समावेश काँग्रेस पक्षाने केला आहे.

Web Title: Nitin Raut is the star campaigner of the Congress for Tamil Nadu