शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

मध्यान्ह भोजनातून ९० विद्यार्थ्यांना विषबाधा

By admin | Updated: July 2, 2014 00:52 IST

मध्यान्ह भोजनातून ९० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुरली येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी घडली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची

ढाणकी (जि.यवतमाळ) : मध्यान्ह भोजनातून ९० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुरली येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी घडली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मंगळवारी १ जुलैला नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात आले. काही वेळातच डोकेदुखी, उलट्या आदींचा त्रास होऊ लागला. तब्बल ९० विद्यार्थ्यांना हा त्रास होत असल्याने त्यांना ढाणकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यापैकी तीन विद्यार्थ्यांना उमरखेड येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. ढाणकी आणि उमरखेड येथे दाखल असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ.कोपटवार यांनी दिली. मुरलीच्या शाळेत २१० विद्यार्थी असून मंगळवारी १९५ विद्यार्थी उपस्थित होते. भोजनात देण्यात आलेली मटकी भिजत ठेवली असता त्यात पालसदृश प्राणी पडून विषबाधा झाल्याचे काही पालक सांगत होते. दरम्यान ढाणकी आरोग्य केंद्रात गटशिक्षणाधिकारी एन.आर. वड्डे, शालेय शिक्षण पोषण आहाराचे अधीक्षक डॉ. प्रमोद सोनटक्के यांच्यासह केंद्रप्रमुख आणि शिक्षक तळ ठोकून आहेत. दोषींवर कारवाई करणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी एन.आर. वड्डे यांनी सांगितले. (वार्ताहर)