शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

मनपाचे नऊ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:13 IST

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.

ठळक मुद्देआयुक्त मुंढे सकाळी ६ वाजताच धडकले : प्रथम सीओसीमधून ट्रेसिंग नंतर प्रत्यक्ष स्थळी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.आयुक्त तुकाराम मुंढे सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालयात पोहोचले. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष २४ तास सुरू असतो. येथे कर्मचाऱ्यांना पाळीमध्ये बोलाविण्यात येते. मात्र रात्रपाळीत असलेले चार कर्मचारी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडत नसल्याचे निदर्शनास आले. कर्तव्यात कसूर केलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ प्रभावाने आयुक्तांनी निलंबित केले.यानंतर मनपा आयुक्त यांनी अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. तेथून शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणी केली. सर्व सफाई कामगारांना घड्याळी देण्यात आल्या आहेत. त्यावरून प्रत्येक कर्मचारी कुठे आहे, त्याचे ट्रॅकिंग केले जाते. मनपा आयुक्तांनी अचानकपणे विविध झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना फोन लावून उलटतपासणी केली. कोण कुठे आहेत, ते लोकेशन तपासले. यानंतर तेथून पाचपावली, इंदोरा, धरमपेठ अशा काही ठिकाणी हजेरी शेडला भेट दिली. तेथील हजेरी रजिस्टरची तपासणी केली. तेथेही काही स्वच्छता निरीक्षक व अन्य कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. त्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेत. यामध्ये आशीनगर झोन क्रमांक ९ चे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोन क्रमांक ५ चे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोन क्रमांक १० चे दिनेश करोसिया यांचा समावेश आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या आकस्मिक पाहणी दौºयात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारीsuspensionनिलंबनtukaram mundheतुकाराम मुंढे