शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

नागपूर महानगरपालिकेत नायलॉन मांजाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:04 IST

नायलॉन मांजाच्या विरोधात गुरुवारी युवक काँग्रेसने आगळेवेगळे आंदोलन केले. नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयातील हिरवळीवर पतंग उडवून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसचे आंदोलन : पतंग उडवून केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नायलॉन मांजाच्या विरोधात गुरुवारी युवक काँग्रेसने आगळेवेगळे आंदोलन केले. नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयातील हिरवळीवर पतंग उडवून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.नगरसेवक बंटी शेळके म्हणाले, नायलॉन मांजाचा विषय गंभीर होत चालला आहे. नायलॉन मांजामुळे प्राणी, पक्षी तर मरतात पण अनेक जण मृत्युमुखी सुद्धा पडतात. कित्येकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. याला जबाबदार कोण? राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतर ही नागपूरच्या बाजारात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे. ही गंभीर बाब आहे याला नागपूर महानगरपालिकाच जबाबदार आहे कारण मांजा तुटल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मांजामुळेही कित्येकांच्या पायांना जखमा झाल्या आहेत. होत आहेत. शहरातील विविध बाजारपेठेत नायलॉन मांजाची विक्री होत आहे. याची कल्पना नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बंदीनंतरही मांजा उपलब्ध होणे हे प्रशासनाचे अपयश आहे. यावर तातडीने कारवाई व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.बसपाचे गट नेते नगरसेवक मोहम्मद जमाल, दीपक गजभिये, सुनील जाधव, अविनाश डेलीकर, तेजस जिचकार यांच्यासह सुशांत सहारे, रिजवान रुमवी, अक्षय घाटोळे, फजलूर कुरेशी, राजेंद्र ठाकरे, राज बोकडे, विक्टोरिया फ्रांसिस, शालिनी सरोदे, सुनील ठाकूर, अखिलेश राजन, संदीप बक्कसरे, चैतन्य मण्डलवार, निखिल बालकोटे, निखिल वांढरे, प्रफुल इजनकर, शेख अशफाक अली, नितीन गुरव, शानू राऊत, हेमंत कातुरे, स्वप्निल बावनकर, विजय मिश्रा, मयूर चिंचोडे, शेख शाकिब, मुजीब अहमद, मयूर माने, अतुल मेश्राम आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते.मनपा आयुक्तांनी दिले कारवाईचे आश्वासनयुवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनानंतर मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांना निवेदन सादर करीत नायलॉन मांजाबाबत प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत मनपा आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले. विभागातर्फे पथक नेमून कोणत्या विक्रेत्याकडे नायलॉन मांजा आहे, यांची कल्पना पोलिसांना देऊ असे सांगितले. यावेळी बंटी शेळके यांनी सांगितले की, काँग्रेसच्या कार्यकाळात शहरातील मुख्यमार्गावरील व पुलावर तार बांधण्यात आले होते. त्यामुळे मांजा रस्त्यावर न पडता तारावरून जात होता व नागरिकांचा गळा सुरक्षित राहत होता, असे उपाय करता येईल, अशी विनंती केली. यावर मनपा आयुक्तांनी यासंबंधात याग्य पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले.जनजागृती मोहीम राबवणारदरम्यान नगरसेवक बंटी शेळके यांनी सांगितले की, युवक काँग्रेसतर्फे शहरात नायलॉन मांजाबाबत जनजागृती राबवण्यात येईल. शहरात फेरी काढून दुकानदारांना व नागरिकांना चायना बनावटीच्या मांजावर बहिष्कार टाकावा. त्यामुळे कोणालाही ईजा पोहोचणार नाही, असे आवाहन केले जाईल, असे सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcongressकाँग्रेस