शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

नागपुरात ‘टेरर लिंक’, ‘एनआयए’चे जिल्ह्यात चार ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’

By योगेश पांडे | Updated: March 23, 2023 10:35 IST

सतरंजीपुरा तसेच कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे, शहरात खळबळ

नागपूर : एनआयएच्या (नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी) पथकाने गुरुवारी नागपूर जिल्ह्यात चार ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ राबविल्याने खळबळ उडाली. शहरात तीन ठिकाणी तीन जणांची चौकशी करण्यात आली. तर कुही-मांढळमधील एका मोबाइल विक्रेत्याचीदेखील झाडाझडती घेण्यात आली. देशविरोधी कृत्य आणि धार्मिक कट्टरता पसरवणारे दहशतवादी मॉड्यूल गझवा-ए-हिंद प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सतरंजीपुरा तसेच कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली.

गुरुवारी पहाटे एनआयएच्या पथकाने कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत गवळीपुरा येथील रहिवासी फरहान अली लियाकत अली, लकडगंज पोलिस ठाण्यांतर्गत सतरंजीपुरा येथील मोठ्या मशिदीजवळ राहणारा मो. अख्तर रजा, मुख्तार रैन व अब्दुल मुख्तादीर, अब्दुल गुलाम मुस्तफा व कुही येथील जमील कुरेशी यांच्या घरावर छापा टाकला. छापा टाकला त्यावेळी चारही जण झोपले होते. एनआयए टीम आणि पोलिसांना पाहून त्यांना धक्काच बसला. एनआयएच्या पथकाने घरांना घेराव घालून झडती घेतली. त्यात मोबाइल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रे सापडली आहेत. यावेळी त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले. पाकिस्तानमधील काही संघटनांशी या दोघांचे बोलणे झाले होते का, याचीदेखील चाचपणी करण्यात येत आहे.

भाड्याने राहत होता गुलाम मुस्तफा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही संशयित ‘गझवा-ए-हिंद’शी संबंधित आहेत. संघटनेच्या म्होरक्यांशी त्यांनी अनेकदा संपर्क केला होता.अब्दुल मुस्तफा हा संबंधित परिसरात भाड्याने राहत होता, अशी माहिती एनआयएच्या नेटवर्कला मिळाली होती. त्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. एनआयएच्या पथकाने संशयितांच्या नातेवाइकांचीही चौकशी केली आहे. फरहान अलीचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. अख्तर फळविक्रेता तर मुख्तदीर ऑटोचालक आहे.

कारवाईदरम्यान काही वेळ तणाव

एनआयएच्या पथकाने पहाटे चार वाजता चार संशयितांच्या घराला घेराव घातला. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना ‘अलर्ट’ मोडमध्ये ठेवण्यात आले होते. एनआयए अधिकारी व पोलिस पाहून दोन संशयितांचे नातेवाईक संतप्त झाले. विनाकारण गोवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कुहीत मोबाइल विक्रेत्याची तपासणी, सहा तास चौकशी

दरम्यान, मांडळ येथील एका मोबाइल दुकानदाराची एनआयएच्या पथकाने चौकशी केली. सकाळच्या सुमारास पथक तेथे पोहोचले व जमील कुरेशीची सहा तास चौकशी करण्यात आली. कुरेशीने २००९ ला मोबाइलचे दुकान सुरू केले होते व विविध कंपन्यांच्या सीमकार्डचीदेखील ते विक्री करत होते. २०१९ला कुरेशीने विकलेल्या काही सीमकार्डचा दुरुपयोग झाल्याची माहिती एनआयएच्या पथकाला मिळाली होती. याबाबत पथकाकडून कुरेशीची चौकशी करण्यात आली. यावेळी कुरेशीचा मोबाइल व २०१९ मध्ये विकलेल्या सीमकार्डसच्या कागदपत्रांची तपासणी केली.

काय आहे ‘गझवा-ए-हिंद’?

‘गझवा-ए-हिंद’चे प्रकरण जुलै २०२२ मध्ये समोर आले होते. बिहारमधील पटना जिल्ह्यातील फुलवारीशरीफ येथे या मॉड्युलमधील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे मॉड्युल पाकिस्तानमधून नियंत्रित होत होते. संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपचा ॲडमिन मरघुब अहमद दानिश याला अटक करण्यात आली होती. त्याने सोशल माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर ‘गझवा-ए-हिंद’ नावाने ग्रुप्स तयार केले होते. मरघुबने त्यात पाकिस्तानसह येमेन, बांगलादेश व भारतातील तरुणांना सदस्य बनविले होते. देशविरोधी कृत्य आणि धार्मिक कट्टरता पसरवण्यासाठी यात तरुणांचे ब्रेनवॉशिंग करण्यात येत होते. याच प्रकरणाची ‘लिंक’ नागपुरातदेखील आढळून आली.

टॅग्स :raidधाडCrime Newsगुन्हेगारीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाnagpurनागपूर