पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडीविषयी महत्वाचा; नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य
By कमलेश वानखेडे | Updated: May 5, 2023 16:33 IST2023-05-05T16:09:45+5:302023-05-05T16:33:07+5:30
Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडी विषयी महत्वाचा आहे, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केले.

पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडीविषयी महत्वाचा; नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य
कमलेश वानखेडे
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडी विषयी महत्वाचा आहे, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केले.
पटोले म्हणाले, धार्मिक संघटना धर्माच्या नावाने लुटणाऱ्या नसायला हव्या. मधाल्या काळात संघटनांनी धर्माला लुटले. संस्था आणि देव यातील फरक पंतप्रधानांना कळतं नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे. राजकीय आखाड्यात आम्हाला रस नाही. आम्हाला सध्या जनतेच्या प्रश्नात इंटरेस्ट आहे, असेही ते म्हणाले.
ते ‘पुन्हा आले’ पण उपमुख्यमंत्री झालेत. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसची काळजी करण्यापेक्षा भाजप पुन्हा सत्तेत येईल का हे पाहावे, असा टोला लगावत मी भविष्य सांगणारा नाही पण जनतेची इच्छा आहे पुन्हा काँग्रेस सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला.