शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
4
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
5
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
6
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
7
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
8
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
9
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
10
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
11
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
12
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
14
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
15
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
16
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
17
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
18
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
19
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
20
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
Daily Top 2Weekly Top 5

नवे परीक्षा नियंत्रक २७ आॅगस्टला मिळणार

By admin | Updated: August 13, 2015 03:35 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकपदाची प्रतीक्षा २७ आॅगस्ट रोजी संपणार आहे.

नागपूर विद्यापीठ : १२ उमेदवार शर्यतीतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकपदाची प्रतीक्षा २७ आॅगस्ट रोजी संपणार आहे. या दिवशी मुलाखती होऊन नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदासाठी १२ उमेदवार शर्यतीत आहेत. याअगोदर विद्यापीठाने दोनवेळा प्रक्रिया राबविली, परंतु एकदाही निवड झाली नाही. यंदा तरी निवड होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विलास रामटेके यांनी मुंबई येथील ‘जे.जे. स्कूल आॅफ आर्किटेक्चर’ येथे ‘प्रोफेसर’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राजीनाम्यानंतर डॉ. श्रीकांत कोमावार, प्रशांत मोहिते व आता डॉ. अनिल हिरेखण यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. विलास रामटेके यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या परीक्षा नियंत्रकपदावर अद्याप पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. परीक्षा विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून निकालांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकांची नियुक्ती व्हावी, यासाठी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे प्रयत्नरत आहेत. नागपूर विद्यापीठाने पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नेमण्यासाठी जाहिरात काढली. इच्छुक उमेदवारांकडून २९ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परीक्षा नियंत्रकपदाच्या शर्यतीत १२ उमेदवार आहेत. यातील पाच नवीन असून उर्वरित सात उमेदवार मागील वेळेचेच आहेत. १२ उमेदवारांमध्ये विद्यापीठाच्या ३ अधिकाऱ्यांचादेखील समावेश असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)