शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

नागपूर जिल्ह्यात आता पुन्हा नव्याने सिरो सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 10:44 AM

Nagpur News, Corona CIRO survey नागपूर जिह्यात अँटीबॉडीज तपासणी म्हणजे ‘सिरो सर्वेक्षण’ पुन्हा होणार आहे. यावेळी ४००० लोकांची तपासणी करून निष्कर्ष काढला जाणार आहे.

ठळक मुद्देजुलै महिन्यात सुरू झालेले सर्वेक्षण रखडले ४००० लोकांची होणार अँटीबॉडीज तपासणी

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : नकळत किती लोकांना कोरोना होऊन गेला होता, याची माहिती घेण्यासाठी नागपूर जिह्यात अँटीबॉडीज तपासणी म्हणजे ‘सिरो सर्वेक्षण’ला जुलै महिन्यात सुरुवात झाली. परंतु किटच्या समस्यांमुळे ही चाचणीच ठप्प पडली. परंतु आता पुन्हा हे सर्वेक्षण होणार आहे. यावेळी ४००० लोकांची तपासणी करून निष्कर्ष काढला जाणार आहे.ज्यांना लक्षणे नाहीत परंतु कोविड होऊन गेलेला आहे, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये कोविड अँटीबॉडीज वाढले असतात. याला वैद्यकीय भाषेत ‘क्लिनिकल इन्फेक्शन’ म्हणतात. अशा संसर्गाचे किती लोक असावेत याचा अंदाज घेण्यासाठी जिल्ह्यातील २४०० लोकांची चाचणी जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली होती. यात नागपूर जिल्ह्यातील १३ तालुके व महानगरपालिकेच्या १० झोनचा समावेश करण्यात आला होता.

मनपा झोन व तालुक्यामधील सामान्य वसाहतीतील १४०० लोकांच्या चाचण्या केल्या जाणार होत्या. कन्टेन्मेंट झोनमधील ६०० तर हायरिक्स ग्रुपमधून ४०० लोकांच्या चाचण्या केल्या जाणार होत्या. पहिल्या टप्प्यात कोविड रुग्णांच्या सेवेत असणारे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, मनपा कर्मचारी, पोलीस व पत्रकारांच्या रक्ताचे नमुनेही गोळा करण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या सहकार्याने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या (मेडिकल) पीएसएम विभागाच्या मदतीने हे सर्वेक्षण सुरू होते. परंतु साधारण ७०० चाचण्यांनंतर अचानक सर्वेक्षण बंद पडले. किटच्या तुटवड्यामुळे ते बंद झाल्याचे सांगण्यात येते.

-महिनाभरात निष्कर्षमेडिकलच्या पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, सिरो सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. ४००० लोकांचे सर्वेक्षण करण्याच्या त्यांच्या सूचना आहेत. साधारण पुढील आठवड्यापासून याला सुरुवात होईल. परंतु यात हायरिक्स व लोरिक्स लोकांचा असा ग्रुप नसणार. मनपाच्या दहाही झोनमधील व तालुक्यातील निवडक लोकांच्या तपासण्या त्यावरून निष्कर्ष काढला जाईल. याला साधारण एका महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.-डॉ. उदय नारलावारप्रमुख, पीएसएम विभाग, मेडिकल

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस