शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपूरनजीक कामठीत संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यात तोडफोड : लाठीचार्ज, अनेक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 11:34 PM

स्टंटबाजी करणाऱ्या युवकांविरुद्ध कठोर कारवाई न करता त्यांना पोलिसांनी सोडले. यातून निर्माण झालेल्या वादामुळे संतप्त नागरिकांच्या गर्दीने जूना कामठी पोलीस ठाण्यात जोरदार गोेंधळ घालत तोडफोड केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. यात अनेकांना मार बसला.

ठळक मुद्देभाजप अध्यक्षासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टंटबाजी करणाऱ्या युवकांविरुद्ध कठोर कारवाई न करता त्यांना पोलिसांनी सोडले. यातून निर्माण झालेल्या वादामुळे संतप्त नागरिकांच्या गर्दीने जूना कामठी पोलीस ठाण्यात जोरदार गोेंधळ घालत तोडफोड केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. यात अनेकांना मार बसला.पोलीसांनी फिर्यादी कामठी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पंजाबराव भानुसे यांच्या तक्रारीवरून कामठी भाजपचे अध्यक्ष विवेग मंगतानी यांच्यासह १५० लोकांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार संतप्त गर्दीने पोलीस ठाण्यात असलेल्या एका वाहनाची तोडफोड केली. कही लोकांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये घुसून सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहोचवले आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही फुटेजचे इलेक्ट्रीक बटन बंद केले. सोबतच उपकरणही तोडले आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु तनाव कायम आहे. त्यामुळेच सकाळी गोंधळ घालणाऱ्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अज्ञात स्थळी ठेवले. दुपारनंतर त्यांना कामठी ऐवजी रामटेकच्या न्यायालयात सादर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना २२ नोव्हेंबरपर्यंत न्यायिक तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले आहे.परंतु या प्रकरणााबत अजुनही रहस्य कायम आहे. कारण जुने कामठी पोलीस ठाण्याचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. लोकमतने गुरुवारी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी अशी कुठलीही घटना घडलीच नाही असे सांगितले. या घटनेशी संबंधित व्हीडिओ दाखविले असता त्यांनी घटना घडल्याचे मान्य केले. सोबतच या प्रकरणी कुणाविरुद्धही गुन्हा दाखल केला नाही, असे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठलीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. हे ही समजू शकले नाही की, अखेर कोणत्या गोष्टीवरून इतका वाद निर्माण झाला की, पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली.प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार ुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास स्थानिक भाजप नेते विवेक मंगतानी आपल्या समर्थकांसह व परिसरातील काही नागरिकांसह जुने कामठी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी कांटी ओळी परिसरातील रस्त्यावर स्टंटबाजी करणारे आणि अधिक गतीने वाहन चालवणाऱ्या बाईक चालकांवर कुठलीही कारवाई न करता सोडल्याच्या कारणावरून गोंधळ घातला. थोड्याच वेळात पोलीस ठाण्यात गर्दी वाढत गेली. ते स्टंटबाजी करणाऱ्या युवकांना तातडीने अटक करण्याची मागणी करू लागले.वाढत गेला वादप्रत्यक्षदर्शीनुसार यादरम्यान पोलीस अधिकारी आणि नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला. प्रकरण शांत होण्याऐवजी आणखी वाढत गेले. अतिरिक्त पोलीस बोलावण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारीही पोहोचले. पहाटे ३ वाजता प्रकरण इतके वाढले की, संतप्त लोकांनी पोलीस ठाण्यात तोडफोड सुरु केली. तर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केली.पोलिसांनी नाही केली कुठलीही कारवाईमिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री .३० वाजता कांटी ओळी परिसरात काही युवक भरधाव गतीने बाईक चालवित रस्त्यावर स्टंटबाजी करीत होते. यावरून रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही लोकांसोबत त्यांचा वादही झाला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. नागरिकांचा आरोप आहे की, स्टंटबाजी करणाऱ्या युवकांची टोळी नेहमीच असे करीत असतात. भरधाव वेगाने बाईक टालवून स्टंटबाजी करतात. पोलिसात तक्रार केली जाते परंतु कुठलीही कारवाई होत नाही. बुधवारीही तसेच झाले. युवकांवर कुठलही कारवाई न करताच त्यांना सोडण्यात आले.पोलीस म्हणतात आरोप चुकीचेयाबाबत जुने कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी कारवाई केली होती. युवकांचे वाहन जप्त करण्यात आले होते. त्यांचे वाहन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.आज कामठी बंदचे आवाहनमंगतानी व इतर लोकांना अटक करण्यात आल्याच्या विरुद्ध कामठी भाजपातर्फे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता जयस्तंभ चौक येथून पोलिसांच्या विरुद्ध रॅली काढण्यात येईल. याबाबत सोशल मिडियावर संदेश व्हायरल करून व्यापाऱ्यांना प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर