शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Supriya Sule : सुप्रिया सुळे रविवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

By कमलेश वानखेडे | Updated: September 30, 2023 15:02 IST

प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार

नागपूर : विदर्भातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना एक नविन उर्जा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे या नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांचा दौरा करणार असून या दरम्यान त्या विविध ठिकाणी भेट देणार व काही मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. सोबतच तिन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत.

१ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर असा तीन दिवसांचा त्यांचा हा विदर्भ दौरा राहणार असून त्यांच्यासोबत पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे प्रदेश पदाधीकारी सुद्धा उपस्थीत राहणार आहेत. रविवारी त्यांचे नागपूर येथे आगमन होणार असून दुपारी १२.३० वाजता दिक्षाभुमीला भेट देणार आहेत. यानंतर स्वागत लॉन, सिव्हील लाईन येथे दुपारी २ वाजता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. स्वागत लॉन येथेच ६ वाजता पत्रकार परिषद घेवून नंतर शहरातील विविध समाविचार जेष्ठ विचावंतासोबत रविभवन येथे बैठक घेवून चर्चा करणार आहेत.

रविवारी त्यांना नागपूर येथेच मुक्काम असून २ ऑक्टोबर रोज सोमवारला त्या सकाळी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. सकाळी त्या ९ वाजता पवनार आश्रमाला भेट देतील. सकाळी १० वाजता सेवाग्राम येथील बापु कुटीला भेट देवून गांधी जयंती निर्मीत्य त्या महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहे. यानंतर सकाळी ११ वाजता जिल्हाधीकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक करणार आहेत. दुपारी १२ वाजता वर्धा येथील विश्राम गृहात त्या काही सामाजीक संघटनासोबत चर्चा करुन दुपारी २ वाजता वर्धा येथील सिव्हील लाईन स्थित महात्मा सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारीऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. ४.३० वाजता पत्रकार परिषद घेवून नंतर जेष्ठ गांधीवादी नेते स्व. वसंतराव कारलेकर यांच्याकडे भेट देवून नंतर अमरावती येथे मुक्कामी जाणार आहेत. 

३ ऑक्टोबर रोज मंगळवारला खा. सुप्रिया सुळे सकाळी ८.३० वाजता अंबादेवी व एकविरा देवीचे दर्शन घेवून सकाळी ११ वाजता कॅम्प रोडवील नविन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचे उध्दाटन करणार आहेत. येथेच त्या पत्रकार परिषद घेवून दुपारी १२ वाजता राजापेठ येथील शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करतील. दुपारी २ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. नंतर त्या नागपूर येथे येवून पुण्याकडे रवाना होणार आहेत.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसVidarbhaविदर्भnagpurनागपूरwardha-acवर्धाAmravatiअमरावती