शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पवारांवरील इडी कारवाईचा राष्ट्रवादीकडून नागपुरात विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:54 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात इडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरुद्ध नागपुरात बुधवारी संतप्त पडसाद उमटले. संविधान चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करीत या कारवाईचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देसंविधान चौकात अर्धनग्न आंदोलन : सरकारविरुद्ध निदर्शने आणि घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात इडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरुद्ध नागपुरात बुधवारी संतप्त पडसाद उमटले. संविधान चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करीत या कारवाईचा निषेध नोंदविला.सायंकाळी ४ वाजता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि निदर्शने करून चौक दणाणून सोडला. सुमारे पाऊण तास सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्तही तगडा ठेवण्यात आला होता. मात्र निदर्शने व घोषणाबाजी करीत हे अर्धनग्न आंदोलन शांतपणे पार पडले.प्रतिक्रिया देताना रायुका शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी म्हणाले, शरद पवार यांच्या दौऱ्याला मिळत असलेला नागरिकांचा प्रतिसाद सहन न झाल्याने निव्वळ भीतीपोटी त्यांच्याविरूद्ध इडीमार्फत खोटे गुन्हे नोंदविले आहेत. भाजपा निव्वळ द्वेषाचे राजकारण करीत आहे. त्याचाच हा एक अनुभव आहे.नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर म्हणाले, शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला जनतेकडून मिळत असलेल्या प्रतिसादाला घाबरून भाजप सरकारने ही कारवाई केली. ज्या बँकेमध्ये ते कधी संचालकसुद्धा नव्हते, अशा बँक गैरव्यवहारप्रकरणी सूडबुद्धीने ईडीमार्फत खोटा गुन्हा दाखल केला.आंदोलनामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर, राकाँचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, कार्यकारी अध्यक्ष जावेद हबीब, महिला अध्यक्ष अलका कांबळे, नुतन रेवतकर, प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य, रायुकाँ शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, बजरंग परिहार, अनिल अहिरकर, नुतन रेवतकर, वर्षा शामकुळे, अविनाश गोतमारे, दीनानाथ पडोळे, दिनकर वानखडे, धनराज फुसे, श्रीकांत शिवनकर, अशोक काटले, देवीदास घोडे, विशाल खांडेकर, रुद्र धाकडे, रोशन भीमटे, नरेंद्र पुरी, वाजिद शेख, महेंद्र भांगे, फैजान मिर्जा, राकेश तिवारी, रिजवान अन्सारी, शोभा भगत, राणी डोंगरे, पुष्प डोंगरे, तौसीफ शेख, अमोल पालपल्लीवार, सौरभ मिश्रा, अमित पिछकाते, अजहर पटेल, सरवर अन्सारी, अनिल बोकडे, प्रणय जांबुळकर, कमलेश बांगडे, तनवीर खान, नफिल अन्सारी, मनीषा साहू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आज सहाही विधानसभा क्षेत्रात आंदोलनशरद पवारांवरील कारवाईच्या निषेधार्थ नागपूर ग्रामीण क्षेत्रातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये गुरुवारी आंदोलन करून निवेदन देण्यार असल्याचा निर्णय सायंकाळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामीण फ्रंटल जिल्हा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी तसेच आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत पक्षकार्यालयात ही बैठक झाली. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी केले आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलनEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSharad Pawarशरद पवार