शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणांनी पुस्तक न पाहता हनुमान चालीसा म्हणून दाखवावी; आम्ही शुद्ध भावनेने.. राष्ट्रवादीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 19:42 IST

Hanuman Chalisa row : उद्या दुपारी नवनीत राणा या राम नगरातील हनुमान मंदिरात हुनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हनुमान चालीसा व सुंदर कांड पठण करणार आहेत.

नागपूरअमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य उद्या (दि. २८) रोजी नागपुरात परतत आहेत. उद्या दुपारी नवनीत राणा या राम नगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. तर, त्याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हनुमान चालीसा व सुंदर कांड पठण करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस व राणा दाम्पत्य आमने-सामने येणार आहेत. यावरून नागपुरातील राजकीय वातावरण आत्तापासून तापायला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रावादी काँग्रेसतर्फे आज उद्या आजोजित करण्यात आलेल्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता पत्रपरिषद घेण्यात आली होती. यामध्ये, राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना चॅलेंज देण्यात आला आहे. नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पुस्तक न पाहता म्हणून दाखवावी, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे. आम्ही शुद्ध भावनेने सुंदरकांड पठण करू, वाद घालणार नाही. पण त्यांनी मुंबईसारखा उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशाराही राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. आता यावर राणा दाम्पत्य व समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे राणा समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. राणा दाम्पत्य उद्या विमानाने नागपुरात पोहोचणार असून, त्यानंतर रॅलीद्वारे हनुमान मंदिर बाजी प्रभू चौक रामनगर येथे पोहोचतील. महाआरतीनंतर ते भाविकांना हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप करणार आहेत. अशी माहिती युवा स्वाभिमान पक्षाकडून देण्यात आली. तर, आज राष्ट्रवादीकडूनही हनुमान चालीस पठणाबाबत कळवण्यात आले असून उद्या राणा दाम्पत्य व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हनुमान चालीसावरून काय सामना रंगतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्याची जेलवारी

खासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईत मोठा गदारोळ झाला होता. यामुळे राणा दाम्पत्याला जेलवारी सुद्धा करावी लागली. काही दिवासांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीच्या बाहेरच हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरला होता. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाल्याचे दिसून आले. हा वाद एवढा वाढला की नवनीत राणा आणि रवी राणा यांना जेलमध्ये जावे लागले होते. यानंतर, नुकतेच त्यांना हनुमान चालीसा म्हटल्यास तुम्हाला जीवे मारू अशी धमकीही मिळाली होती. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. नवनीत राणा यांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नवनीत राणा यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची एका अज्ञाताने धमकी दिली असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. 

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर