नागपुरात पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 19:19 IST2020-06-25T19:18:30+5:302020-06-25T19:19:41+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा विविध स्तरावर निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात ठिकठिकाणी याविरुद्ध आंदोलने करण्यात येत आहेत. याअंतर्गत गुरुवारी नागपुरातही रेशीमबाग चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे आंदोलन करण्यात आले.

नागपुरात पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा विविध स्तरावर निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात ठिकठिकाणी याविरुद्ध आंदोलने करण्यात येत आहेत. याअंतर्गत गुरुवारी नागपुरातही रेशीमबाग चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पडळकरांचा निषेध करीत निदर्शने करण्यात आली.
भाजपने पडळकरांच्या वक्तव्याचा खुलासा करावा, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. कोतवाली पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, शहर कार्याध्यक्ष जावेद हबीब, गटनेते नगरसेवक दुनेश्वर पेठे, सतीश इटकेलवार, डॉ. विलास मूर्ती, दिनकर वानखेडे, धर्मेंद्र खमेले, अशोक काटले, अविनाश शेरेकर, मिलिंद मानापुरे, रवी इटकेलवार, मेहबूब खान पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पडळकरांचे वक्तव्य निषेधार्ह : सलील देशमुख
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य केवळ निषेधार्ह नव्हे तर हीन पातळीचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व जि. प. सदस्य सलील देशमुख यांनी व्यक्त केले. परावलंबी आमदार पडळकर यांनी स्वयंभू नेते शरद पवार यांच्यावर बोलू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
आमदार पडळकर यांना शरद पवार यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शरद पवार यांचे योगदान सगळ्या देशाला माहिती आहे. पडळकर सध्या भाजपच्या खांद्यावर बसून राजकारण करीत आहेत. शरद पवार हे स्वयंभू नेतृत्व आहे. त्यांनी महाराष्ट्र व देशाच्या विकासाला दिलेले योगदान कुणीही विसरू शकत नाही. याची जाणीव आमदार पडळकर यांनी ठेवावी, असेही सलील देशमुख यांनी म्हटले आहे.