शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

नक्षलसमर्थक शोमा सेनला विद्यापीठाचा ‘धक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:29 PM

नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रा. शोमा सेन यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दणका दिला आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरून निलंबित करण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भातील निर्णय घेतला असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

ठळक मुद्देनिलंबित करणार : नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रा. शोमा सेन यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दणका दिला आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरून निलंबित करण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भातील निर्णय घेतला असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.नक्षली कारवायांमधील सहभागी, पुण्यातील ‘एल्गार’ परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी पुणे पोलिसांनी प्रा.शोमा सेन यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी त्यांच्यासह एकूण पाच लोकांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांचा समावेश होता. प्रा.सेन विद्यापीठाच्या सेवेत असल्याने अटकेनंतर ४८ तासांच्या आत त्यांचे निलंबन होणे आवश्यक होते. मात्र दबावगट सक्रिय झाल्याने विद्यापीठाने कारवाईस टाळाटाळ केली व निलंबन झालेच नाही. यासंदर्भात अखेर कुलगुरूंनी कायदेशीर सल्ला घेतला व प्रा.सेन यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी यासंदर्भातील आदेश निघण्याची शक्यता आहे.‘तो’ फोन कुणाचा ?दरम्यान, विद्यापीठाने प्रा.सेन यांच्या अटकेच्या ४८ तास उलटून गेल्यानंतरदेखील कारवाई न केल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत होते. ही बाब थेट मंत्रालयातदेखील पोहोचली होती. कुलगुरुंना यानंतर मुंबईहून एक फोन आला व त्यानंतर निलंबनाबाबतची सूत्रे हलली. विद्यापीठाने वेळेत कारवाई का केली नाही व हा फोन नेमका कुणाचा होता हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर