शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

महाराष्ट्राला लागलेला शनी दूर व्हावा, राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा पठण; मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 18:42 IST

Hanuman Chalisa row : महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहोत, असे नवनीत राणा म्हणाल्या.

ठळक मुद्देमंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नागपूर : राणा दाम्पत्याचे पावने एक वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरून ते रामनगर परिसरातील मारुती मंदिरात पोहोचले असून हनुमान आरतीला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी, विमानतळावर राणा दाम्पत्याचे समर्थकांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार म्हटल्यावर आम्हाला नागपूर विमानतळावर अडवण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. 

महाराष्ट्रात राम, हनुमान आणि हनुमान चालीसासाठी एवढा विरोध का होत आहे हे कळत नाही. दिल्लीत आम्ही हनुमान चालीसा पठण केलं, रॅली काढली त्यावेळी तिथे सुरक्षा व्यवस्था होती, तिथे काही त्रास झाला नाही. पण, ३६ दिवसांनंतर जेव्हा आपण राज्यात येतो आणि देवाचे दर्शन घेण्यासाठी जातो, तेव्हा इतका विरोध का? उद्धव ठाकरेंना दुसरं काम नाहीये का? आज शनिवार आहे, महाराष्ट्राला लागलेला हा शनी दूर झाला पाहिजे आणि त्यासाठी मी दर दिवशी हनुमान चालीसा आणि आराधना करेन, असे नवनीत राणा म्हणाल्या. राज्यावरील संकट टळावे यासाठीच आज आम्ही नागपुरात हनुमान चालीसाचे पठण करत आहोत, असेही राणांनी सांगितलं.

तर, रवी राणा यांनी आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवताच मुख्यमंत्र्यांची झोप उडते, म्हणून हनुमान चालीसा पठणला विरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची फौज इथे उभी केली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. तसेच, येत्या काळात हनुमान भक्त आणि राम भक्त मुख्यमंत्र्यांना धडा शिकवतील. महाराष्ट्रात आलेलं संकट आम्हाला दूर करायचं आहे, असेही रवी राणा म्हणाले.

दरम्यान, राणा दाम्पत्य रामनगर येथील हनुमान मंदिरात पोहोचले आहेत. पोलिसांनी सुरक्षिततेसाठी परिसरात कडेकोट बंदोबस्त केलाय. पोलिसांनी राणा यांच्या स्वागतासाठी वाजत असलेला ढोल ताशा बंद केला. मंदिरात हनुमान आरतीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना या परिसरातून आधीच दूर पाठवण्यात आले आहे. संपूर्ण चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लागले आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाnagpurनागपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस