शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नागपुरात घरी नैसर्गिक मृत्यू झालेला मृतदेहही येत आहे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:01 IST

मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत असे ६४ मृतदेह पॉझिटिव्ह आले आहेत. तर, गळफास लावून मृत्यू झालेले पाच, पाण्यात बुडून मृत्यू झालेले चार, अपघातात मृत्यू झालेले दोन, खून व विष प्राशन करून मृत्यू झालेले प्रत्येकी दोन असे एकूण १३ मृतदेह कोरोनाबाधित होते.

ठळक मुद्देअपघात, खून झालेलेही ‘पॉझिटिव्हनैसर्गिक ६४ मृतांमध्ये सापडले ‘कोरोना’चे विषाणू नागपुरात बाधित मृतदेहाचा आकडा वाढतोय

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या दहशतीत रोजच्या रुग्णसंख्येचे उच्चांक गाठले जात आहे. यामुळे कोण, कुणाच्या संपर्कात येऊन पॉझिटिव्ह येईल, याचा नेम राहिला नाही. विशेष म्हणजे, घरी नैसर्गिक मृत्यू झालेला मृतदेहही पॉझिटिव्ह येत आहे. मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत असे ६४ मृतदेह पॉझिटिव्ह आले आहेत. तर, गळफास लावून मृत्यू झालेले पाच, पाण्यात बुडून मृत्यू झालेले चार, अपघातात मृत्यू झालेले दोन, खून व विष प्राशन करून मृत्यू झालेले प्रत्येकी दोन असे एकूण १३ मृतदेह कोरोनाबाधित होते.

संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून, शिंकेतून किंवा बोलताना तोंडातून बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून (ड्रॉपलेट्स) कोरोनाची प्रामुख्याने बाधा होते. मात्र, हा विषाणू पृष्ठभागांवर अनेक दिवसही सक्रिय राहू शकतो. मृतदेहाकडून लागण होण्याची शक्यता कमी असली तरी धोका कायम असतो. रुग्णालयाच्या एका पाहणीत असे आढळून आले की, ८ तासानंतर मृतदेहाचे तपासलेले नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे योग्य पद्धतीने कोविड पॉझिटिव्ह मृतदेह हाताळणे व अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे.

नागपूर जिल्ह्यात पहिल्या कोविड पॉझिटिव्ह मृतदेहाची नोंद ५ एप्रिल रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) न्यायवैद्यकशास्त्र विभागात झाली. तेव्हापासून मेयो, मेडिकलच्या या विभागाकडे संशयित मृतदेहाच्या तपासणीचा भार वाढला आहे. सध्या मेयोमध्ये रोज १५ ते २० तर मेडिकलमध्ये ३० ते ४० मृतदेह येत आहेत. या सर्वांची नियमानुसार कोविड तपासणी केली जात आहे.पॉझिटिव्ह अहवाल आल्यास महानगरपालिकेच्या ताब्यात मृतदेह दिला जात आहे.

मेयोमध्ये ५०, मेडिकलमध्ये २६ मृतदेह पॉझिटिव्हउपलब्ध माहितीनुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात साधारण ६३० मृतदेह शवविच्छदनाला आले. या सर्वांची कोविड तपासणी केली असता ५० मृतदेह पॉझिटिव्ह आले. यातील चार गळफास, दोन पाण्यात बुडालेले, तर दोन रस्ता अपघातातील होते. मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात गेल्या महिनाभरात २७ मृतदेह पॉझिटिव्ह आले. यात २२ नैसर्गिक मृत्यू, पाण्यात बुडालेले दोन, गळफास लावलेला एक, विष प्राशन केलेला व एक खून झालेला व्यक्तीचा मृतदेह होता.

श्वसनाच्या आजाराने दगावलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसात आणि इतर अवयवांमध्ये विषाणू असू शकतात. हे विषाणू शवविच्छेदन करताना वापरण्यात येणारी अवजारे किंवा आतला भाग स्वच्छ करताना पसरू शकतात. त्यामुळे ‘कोविड’मुळे दगावलेल्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना प्रशिक्षित व्यक्तीकडूनच करण्यात यावे, हे कटाक्षाने पाळले पाहिजे.-डॉ. मकरंद व्यवहारे, विभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, मेयो

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस