National Inter Religious Conference: जिहाद शब्दाचा वापर चुकीचा केला जातोय - हाजी सय्यद सलमान चिश्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 03:32 PM2021-10-24T15:32:33+5:302021-10-24T15:33:45+5:30

National Inter Religious Conference: ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद पार पडली. तत्पूर्वी हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी संवाद साधला.

National Inter Religious Conference: The word jihad is being misused - Haji Syed Salman Chishty | National Inter Religious Conference: जिहाद शब्दाचा वापर चुकीचा केला जातोय - हाजी सय्यद सलमान चिश्ती

National Inter Religious Conference: जिहाद शब्दाचा वापर चुकीचा केला जातोय - हाजी सय्यद सलमान चिश्ती

googlenewsNext

नागपूर : गेल्या काही दिवसांत तालिबान आणि दहशतवाद्यांमुळे जिहाद शब्द चर्चेत आला आहे. याबाबत अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांना विचारले असता संपूर्ण जगात जिहाद हा शब्द आहे, त्याचा चुकाचा वापर केला जात आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद पार पडली. तत्पूर्वी हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी संवाद साधला. यावेळी जिहाद-लव्ह हा शब्द आहे, त्याचा चुकाचा वापर केला जात आहे. संपूर्ण जगात चुकीचा शब्द जद्दोजहद (संघर्ष) आहे. जर एखादा मजूर दिवसभर काम करण्यासाठी जात आहे, तर म्हणतो आज जद्दोजहद करायचे आहे, तर हा आपल्या शब्दसंग्रहातील एक हिस्सा आहे, असे  हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले. 

याचबरोबर, मेहनत, शांततेसाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. पैगंबर मोहम्मद साहब यांचा हा महिना आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबीचा महिना आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत ट्विट केले होते. आम्ही पैगंबर मोहम्मद यांना मानतो, पण त्यांची शिकवण सामान्य लोकापर्यंत पोहोचवली तर याबाबतचा जो चुकीचा संवाद आणि दुरावा होत आहे, तो दूर होईल, असे हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी म्हटले आहे.

दरम्यान, हाजी सय्यद सलमान चिश्ती यांचे कुटुंबीय गेल्या ८०० वर्षांपासून अजमेर शरीफ दर्गाची सेवा करीत आहेत. सध्या सेवा करणारी त्यांची पिढी ही २६ वी आहे. गेल्या ८०० वर्षांपासून अजमेर शरीफ येथे दररोज हजारो लोकांना लंगर सेवा पुरवली जाते. यात सर्वधर्मीयांचा समावेश असल्याने शुद्ध शाकाहारी जेवण तयार केले जाते. कोविडकाळातही लोकांची मोठ्या प्रमाणावर सेवा करण्यात आली. यासोबतच आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रातही काम केले जाते.

Web Title: National Inter Religious Conference: The word jihad is being misused - Haji Syed Salman Chishty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.