शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय ग्राहक आयोग : मोदी, चोकसीच्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चरला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 20:24 IST

पंजाब नॅशनल बँकेला सुमारे २० हजार कोटी रुपयांनी फसविणारे व्यावसायिक मेहुल चोकसी व नीरव मोदी हे संचालक असलेल्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे.

ठळक मुद्देतक्रारकर्त्यांना भरपाई देण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंजाब नॅशनल बँकेला सुमारे २० हजार कोटी रुपयांनी फसविणारे व्यावसायिक मेहुल चोकसी व नीरव मोदी हे संचालक असलेल्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. कंपनीविरुद्ध तक्रार करणाऱ्या ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश जारी करण्यात आले आहेत.कंपनीविरुद्ध प्रमोद टिक्कस, मयूर मोदी, रणजित अग्रवाल व गमनजितसिंग यांनी तक्रार दाखल केली होती. या ग्राहकांना सर्व सुविधांसह तीन महिन्यात फ्लॅटस्चा ताबा देण्यात यावा, त्यांच्याकडून वेळोवेळी घेतलेल्या रकमेवर १० टक्के व्याज अदा करण्यात यावे आणि तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, असे आदेश आयोगाने कंपनीला दिले आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, ग्राहकांनी कंपनीच्या बोरिवली, मुंबई येथील योजनेतील थ्री-बीएचके फ्लॅटस् खरेदी केले आहेत. करारानुसार ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत फ्लॅटस्चा ताबा देणे आवश्यक होते. परंतु, कंपनीने कराराचा भंग केला. ही योजना अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. तसेच, योजनेत फ्लॉवर बेड, पार्किंग, जिम्नॅशियम, एसटीपी, जलतरण तलाव, योगा रुम, स्पा रुम, बॅन्क्वेट हॉल, सीसीटीव्ही इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ग्राहकांनी गृह कर्ज घेतले आहे. त्याचा मासिक हप्ता त्यांना बँकेत जमा करावा लागत आहे. कंपनीने १२० ग्राहकांकडून सुमारे २०० कोटी रुपये घेतले आहेत. तक्रारकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. रोहन मालविया यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :consumerग्राहकOrder orderआदेश केणे