शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्रने मांडला लॅण्ड पुलिंग पॅटर्न

By admin | Updated: April 24, 2015 02:13 IST

शेतजमिनीचा अकृषक वापर करण्यासाठी राज्य सरकारने २७ डिसेंबर २०१४ रोजी लॅण्ड पुलिंग टेक्निक सुधार योजनेला मंजुरी दिली होती.

नागपूर : शेतजमिनीचा अकृषक वापर करण्यासाठी राज्य सरकारने २७ डिसेंबर २०१४ रोजी लॅण्ड पुलिंग टेक्निक सुधार योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना सुमठाणा, कोतेवाडा, सोंडापार, जामठा, परसोडी या पाच गावांमध्ये राबविण्याचा नासुप्रचा मानस आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी नासुप्रने गुरुवारी संबंधित पाच गावातील जमीन मालकांची बैठक घेतली व या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली. लॅण्ड पुलिंग पॅटर्न अंतर्गत ६०:४० चा फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला आपल्या १० एकर जमिनीवर अकृषक वापर करायचा असेल तर या योजनेंतर्गत संबंधित शेतकऱ्याला ४० टक्के म्हणजे ४ एकर जमीन रस्ते, उद्यान, शाळा, हॉस्पिटल, पोलीस ठाणे यासह विविध विकास योजनांसाठी उपलब्ध करून द्यावी लागेल व उर्वरित ६० टक्के म्हणजे ६ एकर जमिनीवर त्याला अकृषक वापराची परवानगी दिली जाईल. येथे बांधकाम करता येईल. विशेष म्हणजे या जमिनीवर बांधकामासाठी १.५ एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) मिळेल. बैठकीत नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी योजनेची माहिती दिली. योजनेंतर्गत जमीन मालकाला प्रति १०० चौरस फूटला किती विकास शुल्क भरावे लागेल, हे समजावून सांगितले. या वेळी बऱ्याच जमीन मालकांनी योजनेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. नासुप्रतर्फे संबंधितांना करारनाम्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय करारनाम्याची प्रत प्रत्येक गावाच्या ग्राम पंचायत कार्यालयातही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेबाबत असलेल्या काही शंका जमीन मालकांनी मांडल्या. नासुप्र अधिकाऱ्यांनी त्या शंकांचे समाधान केले. विशेष म्हणजे जमीन मालकांनी या योजनेत आणखी काय सुविधा असाव्यात याविषयी सूचना मांडल्या. या सूचनांचा सकारात्मकपणे विचार करण्याचे आश्वासन सभापती वर्धने यांनी दिले. या वेळी अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, अधीक्षक अभियंता (मेट्रो) प्रवीण कीडे, नगररचना उपसंचालक सुजाता कडू आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)