नागपूरनजीक बुटीबोरीत अडकली नंदिग्राम एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:18 IST2018-09-13T22:18:04+5:302018-09-13T22:18:52+5:30
नंदिग्राम एक्स्प्रेससह तीन रेल्वेगाड्या आज बुटीबोरी रेल्वेस्थानकाजवळ एक तासावरून अधिक काळापर्यंत अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

नागपूरनजीक बुटीबोरीत अडकली नंदिग्राम एक्स्प्रेस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदिग्राम एक्स्प्रेससह तीन रेल्वेगाड्या आज बुटीबोरी रेल्वेस्थानकाजवळ एक तासावरून अधिक काळापर्यंत अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मिळालेल्या माहितीनुसार बुटीबोरी रेल्वेस्थानकाजवळ बुटीबोरी पूल क्रमांक ८१२ येथे रेल्वे रुळाला तडा गेला होता. याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी रेल्वे रुळाच्या डागडुजीच्या कामाला लागले. रेल्वे रुळाला तडा गेल्याचे अचानक लक्षात आल्यामुळे आधी ब्लॉक घेण्याऐवजी तात्काळ ब्लॉक घेऊन डागडुजीचे काम करण्यात आले. यामुळे मुंबईवरून नागपूरकडे येणारी नंदीग्राम एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेससह काही रेल्वेगाड्या बुटीबोरी स्थानकावर तासभर अडकून पडल्या.