शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

हरीश साळवे यांच्यामुळे वाढला नागपूरचा गौरव

By admin | Published: April 02, 2015 2:36 AM

यंदा पद्मभूषण सन्मान प्राप्त झालेल्या मान्यवरांमध्ये नागपुरात जन्मलेल्या आणि न्यायासाठी खपणाऱ्या एका लढवय्याचाही समावेश आहे.

नागपूर : यंदा पद्मभूषण सन्मान प्राप्त झालेल्या मान्यवरांमध्ये नागपुरात जन्मलेल्या आणि न्यायासाठी खपणाऱ्या एका लढवय्याचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील व माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे असे या लढवय्याचे नाव आहे. नुकत्याच आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले. विधी क्षेत्रातील मान्यवरांनी साळवे यांना हा सन्मान मिळाल्यामुळे आनंद व्यक्त करतानाच नागपूरचा गौरव वाढल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र के. पी. साळवे यांचे सुपुत्र असलेले हरीश साळवे देशातील एक निष्ठावंत आणि प्रामाणिक विधिज्ञ म्हणून ओळखले जातात. राजकारणाचा वारसा असलेल्या घरात जन्म घेऊनही हरीश साळवे यांनी वेगळी वाट चोखाळली. कुठल्याही राजकीय पक्षासोबत ते सक्रियपणे जुळले नाहीत. म्हणूनच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचा पुत्र असतानाही तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये त्यांना सरकारच्या सॉलिसिटर जनरलपदी नेमले होते. सन २००२ पर्यंत साळवे या पदावर होते. काही वैयक्तिक कारणांमुळे या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांनी नकार दिला होता. देशातील प्रमुख कॉर्पोरेट घराण्यांचे सर्वात मोठे वकील अशीही साळवेंची एक ओळख आहे. ‘सर्व उद्योगपती भ्रष्ट आणि अप्रामाणिक असल्याचा एक सार्वत्रिक समज आहे, असे असेल तर सर्वांना तुरुंगात डांबा’, असे हरीश साळवे एका मुलाखतीत म्हणाले होते. गुजरात दंगलीतील पीडित बिल्किस बानोचा खटला साळवे यांनी लढला होता. हरीश साळवे यांंचे शालेय शिक्षण एसएफएस शाळेत झाले आहे. सदर येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. साळवे यांनी सुरुवातीला ‘सी.ए.’चे शिक्षण घेतले होते. यानंतर ते वकिलीकडे वळले. करविषयक कायद्यांचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला त्यांचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी १९८० मध्ये वकिली व्यवसायाला सुरुवात केली. यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ते प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. काही उच्च न्यायालयांतही त्यांनी वकिली केली आहे. त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले आहे. त्यांनी माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत कार्य केले आहे.(प्रतिनिधी)